*विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला प्रस्ताव.*
*विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला प्रस्ताव.*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे.
अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले होते. त्यानंतर 2019 आणि 2014 असे सलग दोनवेळा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले, आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली. दादांच्या बालेकिल्ल्याचे पिंपरीचे शिलेदार म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.
Chief Editor Nazeer Wagu
Reported by Irfan Shaikh
8879726577