*अंमली पदार्थ विरोधी पथक Pimpri Chinchwad, गुन्हे शाखेची धडक कारवाई* *”गांजा विक्री ०१ इसम १० किलो गांजा सह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात”*
*अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई*
*”गांजा विक्री ०१ इसम १० किलो गांजा सह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात”*
*गांजा विक्री ०१ इसम १० किलो गांजा सह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात”*
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. दि २०/०३/२०२५ रोजी सपोनि विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्षे व विजय दौंडकर हे सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पेट्रोलींग करीत असताना प्रथम रेस्ट्रो बारचे समोर, पाण्याचे टाकीचे कंपाऊंडचे शेजारी रस्त्याचे कडेला पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना एक इसम टि.व्ही.एस. ज्युपीटर या दुचाकी गाडीवर पाठीवर सॅकबॅग व गाडीचे पुढील बाजुस ट्रॅव्हलींग बॅग घेवुन थांबलेला दिसला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव हरिश मगन सोनवणे, वय २७ वर्षे, रा काळभैरवनगर, यशस्वी हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र १२, पिंपरी गाव, पिंपरी पुणे मुळ रा. मौजे शिरपुर, वरवाडे, संत सावतामाळी चौक, ता शिरपुर जि धुळे असे असल्याचे सांगितले. त्याला तेथे थांबण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याचे वागणे संशयास्पद असल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे, त्याचे सॅकबॅग व ट्रॅव्हलींग बॅगमध्ये मिळून १० किलो १३८ ग्रम गांजा, ०२ मोबाईल व टि.व्ही.एस. ज्युपिटर ही दुचाकी असा माल मिळुन आला तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. इसम नामे हरिश मगन सोनवणे, वय २७ वर्षे, रा काळभैरवनगर, यशस्वी हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र १२, पिंपरी गाव, पिंपरी पुणे मुळ रा. मौजे शिरपुर, वरवाडे, संत सावतामाळी चौक, ता शिरपुर जि धुळे याचे ताब्यात एकुण ५,८८,९००/- किंमतीचा १० किलो १३८ ग्रम गांजा, ०२ मोबाईल व टि.व्ही.एस. ज्युपिटर ही दुचाकी असा माल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे ९१/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, राहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्षे व विजय दौंडकर यांचे पथकाने केली आहे.
Chief Editor Nazeer Wagu 8879726577
Reported by Irfan Shaikh