*अमली पदार्थ विरोधी पथक*पिंपरी चिंचवड *गुन्हे शाखा ची धडक कारवाई!*
*अमली पदार्थ विरोधी पथक* *गुन्हे शाखा ची धडक कारवाई!*
” *धुळे येथून गांजा तस्करी करून उद्योग नगरी पिंपरी चिंचवड* *शहरात हिंजवडी आय. टी पार्क,तसेच शिक्षण संस्था परिसरात गांजा विकणारे* *तीन इसम ३३ किलो गांजासह अमली पदार्थ विरोधी पथ काच्या ताब्यात”.*
. मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे,श्री.संदीप डोईफोडे, मां. सह पोलिस आयुक्त गुन्हे 2, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शन खाली अमली विरोधी पथक,गुन्हे शाखा कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी पथकतील सह.पोलिस निरीक्षक सचिन कदम,विक्रम गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्र्वर दळवी, व पोलिस अमलदार,यांची वेगळी वेगळी पथक तयार करून पिंपरी पोलिस आयुक्तालय हद्दीत कोणत्या ही प्रकारचे अमली पदार्थाचे अवैध विक्री वर आला घालणे करिता व अमली पदार्थांचा समुल उच्चाटन करणे बाबद आदेशित केले.सपोनी विक्रम गायकवाड व पथक हे हिंजवडी म्हाळुंगे परिसरात गस्त करीत असताना पोलिस अंमलदार निखिल शेटे व मयूर वाडकर तीन इसम संशयास्पद रित्या जात असताना मिळून आले. सदर तीन इसम नामे १)सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी,वय ३६वर्षे राहणार म्हाळुंगे मौजे येथे भाड्याने मूळ राहणारे चित्रकूट,तहसील श्रीरामपूर,जिल्हा चित्रकूट धाम करवी, राज्य उत्तर प्रदेश,२)अशोक गुलाबचंद पावरा, वय १९वर्षे,राहणार मांजरी पाडा, ता.शिरपूर,जिल्हा धुळे,३)पवान सानु पावरा,वय १९ वर्षे, यांच्या ताब्यातून९,५०,२००/रुपये किमती चे माल ज्यामध्ये १६किलो १०४ ग्राम गांजा हा अमली पदार्थ,२,मोबाईल,व एक दुचाकी गाडी जप्त करून त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलिस स्टेशन गु.र. क्र.१०७४/२०२४,एन. डी.पी.एस ॲक्ट कलम ८क,२०(ब)(ii )(ब),२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अतोपितान कडे सखोल चौकशी करून त्यांच्या कडून आणखी ८,५०,४५०/किमतीचा १७ किलो ००९ ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.अरोपित हे हिंजवडी येथील आय. टी.पार्क व शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये विक्री करत असल्याचे निष्पन्न होत आहे. सदर गुन्ह्याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक कडील सपोनि सचिन कदम हे करीत असून आरोपीत हे दिनांक
२४/९/२४ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मध्ये आहेत.
आरोपी यास कडून १८लाख ६५० रुपये किमतीचा,३३किलो ११३ ग्राम गांजा,०२ मोबाईल,व एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.पुढील तपास चालू आहे.
सदर कारवाई मां.विनय कुमार चौबे,पोलिस आयुक्त,पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मां.शशिकांत महावरकर,सह पोलिस आयुक्त, मां.वसंत परदेशी,अप्पर पोलिस आयुक्त,, मां.संदीप डोईफोडे,पोलिस उप आयुक्त,गुन्हे, मां.विशाल हिरे,सह पोलिस आयुक्त,गुन्हे १, मां.बाळासाहेब कोपनर ,सह पोलिस आयुक्त,गुन्हे२,यांच्या मार्गदर्शन खाली अमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
संतोष पाटील,सह पोलिस निरीक्षक सचिन कदम,विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी,पोलिस अमलदार मयूर वाडकर,निखिल शेटे,प्रदीप शेलार,किशोर परदेशी,शिल्पा कांबळे,निखिल वरपे,राजेंद्र कांबळे, गणेश करपे,सदानंद रुद्रक्षे,रणधीर माने,कपिलेश इगवे,गोविंद डोके,पांडुरंग फूनदे,व तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी,यांच्या पथकाने केली आहे
W News Channel 8879726577
Reported by: Irfan Shaikh
Chief Editor: Nazeer Wagu