*12 रब्बिऊल अव्वल,रोजी मस्जिद जमाते सुबहनिया* *मध्ये रक्त दान कार्यक्रमात युवा वर्ग चा उत्स्पूर्त प्रतिसाद.:काळेवाडी.***


*12 रब्बिऊल अव्वल,रोजी मस्जिद जमाते सुबहनिया*
*मध्ये रक्त दान कार्यक्रमात युवा वर्ग चा उत्स्पूर्त प्रतिसाद.:काळेवाडी.***

 

पिंपरी चिंचवड शहरात दिनांक 16 सप्टेंबर,2024 रोजी साला बाद प्रमाणे या वर्षी देखील गणपती विसर्जन आणि 12, रब्बिऊल अव्वल,हजरत मोहम्मद पैगंबर जयंती एकच दिवशी येत असल्याने, सामाजिक बांधिलकी ,सामाजिक एकता,व एकमेकास सहकार्य करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाने निर्णय घेतला की 16 सप्टेंबर,2024 रोजी जुलूस न करत तो जुलूस 19 सप्टेंबर ,2024 रोजी करण्याचा निर्णय जुलूस कमिटी पिंपरी चिंचवड शहर व या परिसरातील सर्व मस्जिद ट्रस्टी यांनी घेतला आहे.

यंदा अनेक मस्जिद मध्ये हा कार्यक्रम मस्जिद स्तरा वर करण्यात येत आहे.यात प्रामुख्याने काळेवाडी,विजयनगर येथील जमाते सबहनीया मस्जिद व ट्रस्टी यांनी मस्जिद मध्ये रक्त दान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले आहे.यात मस्जिद चे युवा वर्ग के.जी.एन यंग सर्कल व मस्जिद चे सर्व सदस्य गणा नी सहभाग घेतला आहे.

Advertisement

रक्तदान कार्यक्रमाचे,नियोजन पिंपरी चिंचवड ब्लड सेंटर चे टीम नी पाहिले,यात प्रामुख्याने डॉक्टर निखिल गावित,तसेच टेक्निशियन सोनाली अहिरराव,कोमल चिकाटे,निकिता शिंदे,बालाजी सुरवसे,तसेच प्रमोद बोराडे यांनी पाहिले .

कार्यक्रमाचे शुरवती लां मौलाना फजले हॅक यांनी कुराण पठण करीत, फातेहा खानी केली,व त्या नंतर रक्त दानाच्या कार्यक्रमास शुरवत केली.रक्त दान श्रेष्ठ दान करीत मस्जिद जमांते सुबहनिया काळेवाडी चे मौलाना फाजले हॅक यांनी रक्त दान करीत शुरवात केली,त्यांच्या बरोबर युवा वर्गातील बॉडी बिल्डर मिस्टर इंडिया,भूषण पद्विलेले नौशाद शेख,तसेच अनेक युवा तरुणांनी रक्त दान केले.

रक्त दान करण्यास युवा वर्ग मध्ये पूर्ण जोश भरलेले पाहण्यास मिळाले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात मस्जिद चे सर्व ज्येष्ठ ट्रस्टी जम्मादीन मुलांनी, चांद भाई शेख,दाऊद शेख,हजरत पटेल,सादिक लंगोटी,मन्सूर भाई,मस्जिद चे नायब इमाम हाफिझ अब्दुल्ला, के.जी.एन यंग सर्कल चे वझीर मुलांनी, नौशाद शेख,सलीम शेख ,कैफ तसेच अनेक युवा तरुण कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले.सर्वांना या ठिकाणी मस्जिद चे वतीने , नाष्टा,फ्रुटी,चहा बिस्कीट दिले गेल व सर्व रक्त दान करणाऱ्यास पिंपरी चिंचवड ब्लड सेंटर कडून सर्टिफिकेट प्रधान करण्यात आले

W News Channel 8879726577

[email protected]

Reported by: Irfan Shaikh

Chief Editor: Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!