मुस्लिम समाजाकडून माजी नगरसेवक ॲड. अय्युब शेख यांना महाविकास आघाडी तर्फे आमदारकीची उमेदवारी देण्याची मागणी


मुस्लिम समाजाकडून माजी नगरसेवक ॲड. अय्युब शेख यांना महाविकास आघाडी तर्फे आमदारकीची उमेदवारी देण्याची मागणी 

 

मुस्लिम समाजाकडून माजी नगरसेवक ॲड. अय्युब शेख यांना महाविकास आघाडी तर्फे आमदारकीची उमेदवारी देण्याची मागणी

पुणे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावी अशी मागणी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे याच अनुषंगाने काल हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी कोंडवा येथे पुणे शहरातील आजी-माजी मुस्लिम नगरसेवक, सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, मुस्लिम धर्मगुरू, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व संमतीने पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते ॲड. अय्युब शेख यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव करण्यात आला. तसेच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत दिला नाही म्हणून व तसेच नुकताच विधान परिषदचे दोन जागा रिक्त झाल्याने तेथेही मुस्लिमांना न्याय दिला नाही म्हणून राज्यात प्रचंड प्रमाणात मुस्लिमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापुढे महाविकास आघाडी कडून मुस्लिम समाजावर अन्याय होऊ व योग्य ते मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून पुणे शहर व जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघापैकी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान दोन मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीने दिली पाहिजे अशी मागणी मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने करण्यात आली. त्याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटून त्यांना विनंती करण्याचा ठराव ही आजच्या बैठकीत मांडण्यात आला.

Advertisement

जमियत ओलेमा हिंदी पुणे जिल्हाध्यक्ष कारी ईद्रीस अन्सारी यांच्या अध्यक्षता खाली झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक ॲड. गफूर पठाण, माजी नगरसेवक मुखतार शेख, माजी नगरसेवक मंजूर शेख, माजी नगरसेवक मुनाफ शेख, स्वीकृत सदस्या हसीना इनामदार, माजी नगरसेविका चांदबी नदाफ यांचे चिरंजीव महबूब नदाफ, मंजूर शेख माजी नगरसेवक, मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन, मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स पुणे शहराध्यक्ष निसार सागर, शिवसेना नेते जावेद खान, ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन अध्यक्ष इकबाल अन्सारी, ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष जाहीद शेख, मुस्लिम बँकचे व्हाईस चेअरमन अली इनामदार, डायरेक्टर बबलू सय्यद, सय्यद सईद, सादिक लुकडे, सिराज बागवान, ॲड. साबीर शेख, इतिहास संशोधक ताहीर शेख, मौलाना शबीह हसन कासमी, विक्रम भाईजान, सौ. रजिया भल्लारी, सौ. गुलशन शेख, सौ. नाझिया शेख, सौ. शमीम पठाण, इब्राहिम खान, इब्राहिम यवतमाळ वाला इत्यादी
मान्यवर उपस्थित होते.

W News Channel 8879726577

wnewschannel12@gmail.com

Reported by: Irfan Shaikh

Chief Editor: Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
04:22