*आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उद्वस्त.पिंपरी चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई.*
*आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उद्वस्त.अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई.*
*दि. २२/०२/२०२४ अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई*
“आंतरजिल्हा गांजा तस्करी करणा-या एका महीलेसह एकूण ०३ आरोपी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात, आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उध्वस्त, ९६ किलो गांजा व दोन चारचाकी वाहनासह ६३ लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त,”
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे. मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २. बाळासाहेब कोपनर यांचे
मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंगलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. सपोनि विक्रम गायकवाड व पथक है चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड व पोलीस अंगलदार निखिल वर्षे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी गिळाली की, एग.एच.०३/ओ.एम./८१८३ या सिल्व्हर रंगाचे टोयाटो इनोव्हा व एग. एच.१८/बी. आर./३४४२ या पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इको या दोन वाहनांमध्ये गांजा हा अंमली पदार्थ असुन सदरची वाहने चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रोहकल फाटा येथून जाणार आहेत. त्यांनी ती माहिती समक्ष वयोनि संतोष पाटील यांना कळविली असता त्यानी तात्काळ दोन पथके तयार करुन बातमीमधील वाहनांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे रोहकल फाटा, पुणे नाशिक रोड येथे नाकाबंदी करत असताना सदर दोन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यातील इनोव्हा मध्ये ०१ इसम व मारुति इको या वाहनामध्ये ०१ इसम व ०१ महिला मिळुन आली. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १. संजय पांडुरंग मोहिते, वय ३९ वर्षे, स गोवित्री, पोस्ट करंजगाव, ता मावळ, जि पुणे, २. मन्सारान नुरजी धानका, वय ४० वर्षे, रा हुरेपाणी, पोस्ट सांगवी, ता शिरपुर जि धुळे व महिला आरोपी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडील वाहनांची पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यातील सिल्व्हर रंगाचे टोयाटो इनोव्हा मध्ये ०२ पांढरे रंगाची गांजा असलेली पोती तर पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इको मध्ये ०४ पांढरे रंगाची गांजा असलेली पोती असे एकुण ०६ पोत्यांमधुन एकुण ९६ किलो २०४ ग्रॅग गांजा गिळुन आला.
आरोपी नामे १. संजय पांडुरंग मोहिते, वय ३९ वर्षे, रा गोवित्री, पोस्ट करंजगाव, ता मावळ, जि पुणे, २. मन्साराम नुरजी धानका, वय ४० वर्षे, रा हुरेपाणी, पोस्ट सांगवी, ता शिरपुर जि धुळे व एक महिला आरोपी यांचे ताब्यातुन एकुण ६३,३१,२००/- किंमतीचा एकुण ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा, ०३ मोबाईल, ०२ चारचाकी व रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन त्यांवेविरुध्द वाकण पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे संजय पांडुरंग मोहिते याचेविरुध्द पुढील प्रमाणे गुन्हें दाखल आहेत.
१) कामशेत पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३२३/२०२३, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ २) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५२/२००५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (क), २९ सदर आरोपीविरुध्द हैद्राबाद येथे एक गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहीती आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंगलदार प्रदिप शेलार, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, निखिल वर्षे, कपिलेश इगये, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनिल भागवत, महादेव बिक्कड तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे तसेच यांचे पथकाने केली आहे.
W News channel. 8879726577
Chief Editor:Nazeer Wagu
Reported by:Irfan Shaikh