*मा *मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे १०० दिवसांकरीता ०७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन* *पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील ५२ गुन्हयामधील जप्त* *६८३.८३० किलो ग्रॅम गांजा नाश**
- *मा *मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे १०० दिवसांकरीता ०७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन* *पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील ५२ गुन्हयामधील जप्त**६८३.८३० किलो ग्रॅम गांजा नाश**
- *६८३.८३० किलो ग्रॅम गांजा नाश*मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे १०० दिवसांकरीता ०७ कलमी कार्यक्रमाचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये दाखल असलेल्या एन. डी. पी. एस. गुन्हयांमधील मुद्देमाल नाश करणेबाबत आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने १) भारत राजपत्र वित्त मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील असाधारण, भाग-२, खंड-३. उपखंड-१, दि. २३/१२/२०२२ मधील सुचना व तरतुदीनुसार, २) महाराष्ट्र शासन, गृह विभाग (विशेष) यांचेकडील अधिसुचना क्र. एनडीपीएस १०९७/९५०३/विशा १ व, दि १७/०४/१९९८, ३) अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गुन्हे/विशा/अंमली पदार्थ समिती/९८/५४१७, पुणे, दि १७/०७/१९९८ नुसार, ४) मा. पोलीस महासंवालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील जा.क्र. पोमंस /२२/अंमली पदार्थ समिती स्थापना/१५५-२०१६/२०१९, मुंबई, दि. १८/१०/२०१९ अन्वये १) अध्यक्ष मा वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, २) सदस्य मा विवेक पाटील, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), ३) सदस्य मा स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, ४) मा संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे), (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे प्रतिनिधी) यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत दाखल एनडीपीएस गुन्हयामधील जप्त अंमली पदार्थ नाश करणेकामी समिती तयार करण्यात आली आहे.
दि. १७/०३/२०२५ रोजी गठित समिती यांचे मार्गदर्शनाखाली १) प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे, २) राज्य उत्पादन शुल्क, पुणे व ३) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे यांचे प्रतिनिधी असे राजंणगाव एम.आय.डी.सी. येथील *Maharashtra Enviro Power Itd, Plot no. P-56, Ranjangoan MIDC, Tal. Shirur, Dist. Pune येथे* प्रत्यक्ष हजर राहुन भट्टीमध्ये एकुण ६८३ किलो ८३० ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा हा अंमली पदार्थ जाळुन नाश केलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), मा. विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय), मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मा. बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ०२ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे श्री. संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांबळे, पोलीस हवालदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, पोलीस शिपाई संतोष स्वामी, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे यांनी केली आहे.
- Chief editor Nazeer wagu
- Reported by Irfan Shaikh