*काळेवाडीत गाड्यांची तोडफोड* *व हफ्ता वसुली जोरात.*
*काळेवाडीत गाड्यांची तोडफोड*
*व हफ्ता वसुली जोरात.*
काळेवाडी परिसरात नढे नगर, नंददीप कॉलनी येथे दिनांक १७/७/२०२४ रोजी , पहाटे ४.३० चे सुमरास,काही मुले गड्यानवर येऊन गाड्या चे काचा फोडत आहे असे लक्षात आल्यावर सदर गाडी मालक दिलीप गुलाबराव सबनानी हे घरा बाहेर आले व त्यांनी या सर्व विषयी या मुलांना कारण विचारले असताना ,या पैकी एकाने मी भाई आहे,माझे नाव अनिकेत विश्वकर्मा आहे ,व त्याच्या हातात असलेली सळई घेऊन तो अंगावर धावून आला व सदर गाडी मालक यांना धमकी दिली की पोलिस स्टेशन ला तक्रार द्याची नाही दिल्यास , जिवे मारून टाकू.,असे म्हणत त्यांनी सदर व्यक्ती चे खिशातून ७०० रुपये काडून घेतले व त्यांच्या संगती असलेल्या त्यांचे दोन साथीदार हे गाडी चालू करून पळून गेले.
सदर बाब होताच सबनानी यांनी पोलिस स्टेशन गाठली व अनिकेत .विश्वकर्मा व त्याचे दोन सहकारी विरुद्ध तक्रार नोंदविली.
वाकडं पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात वाकडं ८१३/२०२४ , भा.न्या.स.(बी.एन.एस) कलम ३०९,३२४(४),३५२,३५१(२),
३(५)सह. मां.पो.अधी कलाम
३७/१,३५ प्रमाणे अनिकेत.विश्वकर्मा व त्याचे दोन साथीदार (अनोळखी इसम)वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घडलेल्या प्रकरण मुले या भागात भीती चे वातावरण आहे.हा संपूर्ण भाग रहिवासी विभाग आहेत.या ठिकाणी सर्व कामगार वर्ग राहत आहे.हा सगळा प्रकार त्यांच्या साठी नवीन आहे.या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक नागरीक भय भित झाला आहे.या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा मिळावी म्हणून त्यांना वाकडं पोलिस ठाण्यात कडून,या परिसरात पोलिस गस्त वाढवून या ठिकाणी शांती प्रस्तापित करावी अशी मागणी होत आहे.
Reported by Irfan Shaikh