*NCP नेता बाबा सिद्दिकी यांची गोळ्या मारून हत्या.*
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.१२) रात्री सव्वानऊच्या सुमारास निर्मलनगर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील झिसान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले होते. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली तर दोन गोळ्या पोटात लागली होती. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. १५ दिवसांपूर्वी त्यांना जीवे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली
*दोन आरोपी जे पकडले गेले,यातील एक हरयाणा च आहे तर दुसरा उत्तरप्रदेश.*
फरार आरोपी ज्याचा शोध घेतला जात आहे.
सदर आरोपी हे मुंबईत मागील दोन महिन्या पासून बाबा सिद्दीकी वर पाळत ठेऊन होते.या पैकी एक आरोपी बाबा सिद्दिकी यांच्या वर पाळत ठेवून संपूर्ण माहिती मुख्य आरोपी ल पुरवत होता.दोन आरोपी यांना क्राईम युनिट3 यांनी घटना स्थळी अटक केले आहे,परंतु मुख्य आरोपी ज्यांनी गोळी मारली तो अद्याप फरार आहे पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे.
बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव देह त्यांचे निकटवर्तीय साठी अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवास स्थानी मक्बा हाईट्स या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे,रात्री ८.३०चे सुमारास त्यांना बडा कब्रिस्तान येथे दफन विधी करण्यात येणार आहे.
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu