*साहेबांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत” अजित दादा”**माजी नगरसेवक, पदाधिका-यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.*( *पिंपरी चिंचवड)*


*साहेबांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत” अजित दादा”*

*माजी नगरसेवक, पदाधिका-यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.*( *पिंपरी चिंचवड)*

पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधान सभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील मोहरे अचूक हेरले होते.

अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांना धक्यावर धक्के दिले होते. मात्र आता अजित पवार त्याची परतफेड करण्याच्या तयारीत दिसत आहेत. अजित पवारांचे शिलेदार असलेले माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष राहिलेले अजित गव्हाणे आपल्या 20 नगरसेवकांसह पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत त्यांनी दिले

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेल्या भोसरी मतदारसंघातील माजी नगरसेवक, पदाधिका-यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. या माजी नगरसेवकांनी चूक झाल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रवेशावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असे सूत्रांनी सांगितले. तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षात असलेले माजी महापौर संजोग वाघेरे हेही अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

Advertisement

गव्हाणे यांच्यासह २५ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. गव्हाणे यांनी शरद पवार पक्षाकडून भाेसरीतून विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा दारुण पराभव झाला. तेव्हापासून या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यातच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला ते माजी आमदार विलास लांडे यांनी शहराचा विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे झाला आहे. पवार कार्यकर्त्यांना ताकद देतात. त्यामुळे अजित गव्हाणे यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबत यावे, यासाठी मी विनंती करणार असल्याचे सांगितले. या माजी नगरसेवकांनीही अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे हे माजी नगरसेवक लवकरच स्वगृही परतणार असल्याचे निश्चित झाले आहे

Chief Editor:Nazeer Wagu 8879726577

Reported by: Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!