*महाराष्ट्राचा डंका ! महाराष्ट्रात येणार गुंतवणुकीचा ओघ**दावोस (Davos) मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीमध्ये (World Economic Forum मध्ये चार लाख,९९हजार,३२१ कोटी चे करार…..*


*महाराष्ट्राचा डंका ! महाराष्ट्रात येणार गुंतवणुकीचा ओघ*

*दावोस (Davos) मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीमध्ये (World Economic Forum मध्ये चार लाख,९९हजार,३२१ कोटी चे करार…..*

मुंबई : दावोस येथे चाललेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा डंका वाजतोय. महाराष्ट्राच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक कंपन्यासोबत सामंजस्य करार झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अशा करारांचा धडाकाच लावला आहे. संरक्षण, स्टील उत्पादन यांच्यासह विविध निर्मिती क्षेत्रांसंदर्भात हे करार होत आहेत. या करारांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

*पहीला मान गडचिरोलीला, गडचिरोलीतील स्टील उत्पादनासाठी ५ हजार २५० कोटींचा करार*

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त राज्य म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील स्टील उत्पादन प्रकल्पासाठी कल्याणी समुहा सोबत ५ हजार २५० कोटींचा करार करण्यात आला आहे. संरक्षण, इलेक्ट्रिक वाहने, स्टील उत्पादन यांच्यासाठी केल्या गेलेल्या या करारातून ४ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. कल्याणी समुहाचे उपाध्यक्ष अमित कल्याणी यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बद्दलच्या सामंजस्य करारा वर स्वाक्षऱ्या केल्या.

*महाराष्ट्रातील संरक्षण उत्पादन क्षेत्र बळकट करण्यासाठी १६ हजार कोटींचा करार*

महाराष्ट्रातील संरक्षण उत्पादन क्षेत्र बळकट करण्यासाठी रिलायन्स इन्फ्रा सोबत १६ हजार ५०० कोटींचा करार करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे होणाऱ्या प्रकल्पातून २ हजार ४५० इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सतीश सेठ यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील इव्ही बॅटरीज आणि २४तास ऊर्जा पुरवठ्याबाबतीत हा करार महत्वाचा ठरणार आहे.

*बालासोर अॅलीसोबत १७ हजार कोटींचा करार, ३ हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित*

उत्पादन निर्मिती क्षेत्राला बळकट करण्यासाठी बालासोर अॅलीसोबत १७ हजार कोटींचा करार झाला आहे. या करारातून ३ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील धातु उत्पादनातील प्रामुख्याने स्टील उत्पादनासाठी हा करार आहे. सतीश कौशिक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. रायगड जिल्ह्यातील दिघी परिसरातील ६०० एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पात तांब्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

*जेएसडब्ल्यु सोबत ३ लाख कोटींचा ऐतिहासिक करार*

महाराष्ट्रातील नवीकरणीय ऊर्जा, रोजगार आणि औद्योगिक प्रगती यांना बळकट करणारा ३ लाख कोटींचा करार करार करण्यात आला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीसोबत हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे गडचिरोलीत २५ टन उत्पादन क्षमतेचा ग्रीन स्टील प्लांट, छत्रपती संभाजी नगरमध्ये ग्रीन मोबिलिटीवर आधारित इलेक्ट्रिक बसेस आणि परवडणाऱ्या गाड्या, पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन्सची उभारणी हे प्रकल्प साध्य होणार आहेत. या गुंतवणुकीतून १० हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*पालघरसाठी १२ हजार कोटींचा करार, ३५०० हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा*

पालघर जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरु शकेल असा १२ हजार कोटींचा करार करण्यात आला आहे. स्टील व धातू उत्पादन क्षेत्रातील या करारामुळे साडेतीन हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या करारासाठी विराज प्रोफाइल्स प्रा. लि. सोबत हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे पालघर जिल्ह्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

*जगातील सर्वात मोठ्या ब्रुअरीसोबत सामंजस्य करार*

Advertisement

जगातील सर्वात मोठी ब्रुअरी असलेल्या एबी इनबेव्हसोबत २५० कोटींचा करार करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातून ३५ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. बिअरची वाढती मागणी आणि त्यात महाराष्ट्राचा वाढता सहभाग यादृष्टीने हा करार महत्वाचा ठरणार आहे. आगामी काळात या क्षेत्रातील उत्पादन वाढवण्याचा या कंपनीचा प्रयत्न असून महाराष्ट्र सरकार त्याला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

*मुंबई महानगर क्षेत्रात डेटा सेंटर उभारणीसाठी २५ हजार कोटींचा करार*

मुंबई महानगर क्षेत्रात डेटा सेंटर उभारणीसाठी ब्लॅकस्टोन- पंचशील रिअॅल्टी, सिडको आणि उद्योग विभाग यांच्यात मुंबई महानगर क्षेत्रात डेटा सेंटर उभारणीसाठी २५ हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारातून ५०० रोजगारांची निर्मिती होणार आहे. ब्लॅकस्टोन – पंचशील रिअॅल्टी आणि उद्योग विभाग यांच्य़ात मुंबई महानगर क्षेत्रात आयटी आणि आटीई सेंटर उभारण्यासाठी २५ हजार कोटींचा करार झाला आहे. यातून एक हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.

*हरित ऊर्जेसाठी ३० हजार कोटींचा करार*

हरित ऊर्जा आणि सौर घटक निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी वारे एनर्जी ही कंपनी नागपूर मध्ये ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणुक करणार आहेत. यातून या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या बांधिलकीला सुनिश्चित केले आहे.

*पायाभूत सुविधांच्या विकासाला बळ देण्यासाठी २ हजार कोटींचा गुंतवणुक करार*

एआय माँट कंपनीसोबत पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी २ हजार कोटींचा करार झाला आहे. पुण्यात उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पामुळे ५ हजार इतके रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.

*टेंबो कंपनीसोबत १ हजार कोटींचा करार*

संरक्षण साहीत्य उत्पादनात महाराष्ट्राची क्षमता वाढवण्यासाठी टेंबो कंपनीसोबत १ हजार कोटींचा करार करण्यात आला आहे. यातून ३०० रोजगार निर्माण होणार आहेत.

 

*अदानी पॉवर बॅटरीज सोबत १० हजार ५०० कोटींचा करार*

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी अदानी पॉवर बॅटरीज सोबत १० हजार ५२१ कोटींचा करार करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या प्रकल्पातून ५ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*जेन्सोल कंपनीसोबत ४ हजार कोटींचा करार*

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी जेन्सोल या कंपनीसोबत ४ हजार कोटींचा करार करण्यात आला आहे. हाही प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथेच उभारण्यात येणार असून यातून ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*बिसलिरी इंटरनॅशनल सोबत २५० कोटींचा करार*

अन्न आणि पेये या क्षेत्रासाठी बिसलिरी इंटरनॅशनल सोबत २५० कोटींचा करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून ६०० रोजगार अपेक्षित आहे.

*एच टू ई पॉवर सोबत १० हजार ७५० कोटींचा करार*

पुणे शहरात उभारण्यात येणाऱ्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी १० हजार ७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून १८५० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*झेड आर टू समुहासोबत १७,५०० कोटींचा करार*

ग्रीन हायड्रोजन आणि केमिकल्स क्षेत्रासाठी झेड आर टू समुहासोबत १७,५०० कोटींचा करार करण्यात आला आहे. यातून २३ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*ब्ल्यू एनर्जी मोटर्स ३५०० कोटींचा करार*

इव्ही,ऑटोमोबाइल्स क्षेत्रासाठी ब्लू एनर्जी सोबत ३५०० कोटींचा करार करण्यात आला आहे. पुणे येथे उभा राहणाऱ्या या प्रकल्पातून ४ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*ब्लू एनर्जी आणि एस्सार सोबत ८ हजार कोटींचा करार*

हरित ऊर्जेसाठी एस्सार आणि ब्लू एनर्जीसोबत ८ हजार कोटींचा करार करण्यात आला आहे. यातून २ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

*बुक माय शो सोबत १७०० कोटींचा करार*

मुंबई महानगर क्षेत्रासाठी करमणुक क्षेत्रासाठी बुक माय शो साठी १७०० कोटींचा करार करण्यात आला आहे. यातून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे.

*वेल्स्पून लॉजिस्टीक सोबत ८५०० कोटींचा करार*

लॉजिस्टीक क्षेत्रासाठी वेल्स्पून लॉजिस्टीक सोबत ८५०० कोटींचा करार करण्यात आला आहे. यातून १७३०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!