*पिंपरी चिंचवड मध्ये डेंग्यू,मलेरिया,हिवताप आजार पुन्हा रडारवर.*
*पिंपरी चिंचवड मध्ये डेंग्यू,मलेरिया,हिवताप आजार पुन्हा रडारवर.*
डेंग्यू). एक विषाणुजन्य रोग / ताप. डेंगी हा रोग डेन्व्ही (DENV) या विषाणूमुळे होणारा फ्ल्यूसारखा, तीव्र स्वरूपाचा आहे. ईडिस प्रजातीच्या मुख्यत: ईडिस ईजिप्ताय जातीचे डास या रोगाचे वाहक असून या डासांच्या मादीच्या चावण्यामुळे डेंगी होतो, तसेच प्रसारित केला जातो. तीव्र ताप हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. तापाबरोबरच अंग खूप दुखणे, हे सुद्धा एक लक्षण असल्याने या रोगाला ‘हाडमोड्या ताप’ म्हणतात. या रोगाचा प्रसार उष्ण प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर होत असून आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडातील अनेक देशांत या रोगाचे रुग्ण आढळून येतात. काही मोजक्या रुग्णांमध्ये या रोगाचे रूपांतर ‘डेंगी रक्तस्रावात्मक ताप’ किंवा ‘डेंगी आघात लक्षणसमूह’ असे अधिक गंभीर स्वरूपात होते. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. मराठीमध्ये या रोगाला ‘डेंग्यू’ म्हटले जाते. या नोंदीत मात्र डेंगी ही जगात सर्वत्र प्रचलित असलेली संज्ञा वापरली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मागे,डेंग्यू अजारा संदर्भ एक मोठी मोहीम मां.आयुक्त.श्री शेखर सिंह यांनी राबविली.शहराला डेंग्यू मुक्त करण्या साठी लाखो रुपयांचा चुराडा देखील केला.त्यात या होणाऱ्या पावसा मुले पुन्हा शहरात हिवताप, मलेरिया,डेंग्यू आजार विषयी चर्चा रंगू लागली आहे.
पाऊसाने विश्रांती घेतली आहे,धरणाच्या पाण्यानी आलेला पुराचे पाणी देखील ओसरले आहे.परंतु या पुराच्या पाण्यामुळे अनेक वस्ती,झोपडपट्टी,सोसायटी,नदी पात्रात असणारे घरे हे बाधित झाले आहे.या सर्वांना आर्थिक नुकसानीचा सामना तर करावेच लागणार आहे परंतु ,या सर्व विषयी त्या त्या भागात परिस्थिती गंभीर बनली आहे.जिकडे तिकडे पाणी साचले आहे, घान,कचरा सगळे या पुराचे पाण्यानी जमा झाले ले दिसते. सदर करांवश या ठिकाणी ,डेंग्यू मच्छर, ला,वाढ मिळण्यास पोषक वातावरण आहे.या मुळे पुन्हा शहरात डेंग्यू ची लाट येण्याची शक्यता नागरीक कडून वर्तवली जात आहे.पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा ,काळेवाडी,पवना नगर,स्मशान भूमी परिसर,इंडियन कॉलनी,अयप्पा मंदिर परिसर,शांती कॉलनी परिसर,तसेच थेरगाव ,जगताप नगर,केजुबई मंदिर परिसर,चिंचवड पोतदार शाळे मागे,केशव नगर परिसरात,व,नदी काठी असलेले सांगवी,जुनी सांगवी,कासारवाडी,दापोडी,फुगेवडी हे सर्व परिसरात आरोग्य मोहीम राबविण्यात यावी व डेंग्यू आजार वाढू नये म्हणून सुरक्षा उपाय म्हणून साफसफाई,तसेच औषध फवारणी मोहीम लवकरात लवकर राबविण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मधील नागरीक करीत आहे.
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu
8879726577