*पिंपरी चिंचवड *शहरात भयंकर* *पूर परिस्थिती….* *शहरातील* *मध्य भागी साई* *चौक,मोरया* *गोसावी** *मंदिर,काळेवाडीत आय्यापपा* *मंदिरात ,इंडियन कॉलनी,स्मशान भूमी, घरकुल पाणी* **शिरले.*जन जीवन विस्कळीत*
*पिंपरी चिंचवड *शहरात भयंकर* *पूर परिस्थिती….*
*शहरातील* *मध्य भागी साई* *चौक,मोरया* *गोसावी** *मंदिर,काळेवाडीत आय्यापपा* *मंदिरात ,इंडियन कॉलनी,स्मशान भूमी, घरकुल पाणी* **शिरले.*जन जीवन विस्कळीत*
पिंपरी चिंचवड शहरात मागील तीन ते चार दिवसा पासून सलग होत असलेले अतिवृष्टी ने जन जीवन हे विस्कळीत झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात पवना नदी चे पाण्यानी विळखा घातला आहे.नदी लागत असलेले भागात पाणी शिरल्याने या भागात जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.हवामान खात्याने दिलेली माहिती लक्षात घेत पुढील २४ तास रेड अलर्ट जाहीर केले आहे.मावळात डोंगराळ भागात होत असलेले अतिवृष्टी ने मोठ्या प्रमाणावर पवना धरण हे भरले जात आहे.
आज पवना धरणातून विसर्ग केले जाणार आहे,पवना नदी काठी राहणारे सर्व नागरिकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करून देणे ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका व्यवस्था कमिटी ची कसरत आहे.
या पूर स्थिती मध्ये अनेक कुटुंबाचे आर्थिक नुकसान होणार आहे.
काळेवाडी या ठिकाणी, आयप्पा मंदिरात पवना नदी चे पाणी शिरले आहे,हा संपूर्ण परिसर बाधित झाला आहे.याच ठिकाणी इंडियन कॉलनी चे बराच भाग पवना नदी चे विळख्यात सापडला आहे.अनेक घर ,कुटुंब या जल संकटात सापडले आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे टीम स्थापत्य विभागाचे लोखंडे साहेब हे पाहणी करीत आहे.त्यांच्याशी चर्चा केली असताना ,त्यांनी आम्हास माहिती दिली की, या सर्व कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी,मराठी शाळा काळेवाडी येथे स्थलांतरित केले जाणार आहे.या बाधित कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.घरात पाणी शिरल्याने घरातील लाकडी फर्निचर, दरवाजे,टेबल इत्यादी सामान,हे खराब होणार आहे.लहान मुले,मुली,ज्येष्ठ यांना या पुरा मुले त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
तसेच पवना नगर भागात जल स्थार हे खूप वाढले आहे.ज्योतिबा उद्यानात आज पाहणी केली असताना ,पवना नदी चे पाणी हे उद्यान सीमा भिंती ल लागले आहे.आज पवना धरणातून होणार विसर्ग हा मोठा आहे.मध्ये रात्री हे जल स्थार् वाढून उद्यान तसेच पवना नगर ,गल्ली नंबर ४,या ठिकाणी पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांची व या ठिकाणी राहणारे सामाजिक कार्यकर्ते,यांची मागणी आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ने या ठिकाणी आपली बचाव टीम लावावी. अपात कालीन परिस्थिती उधभवली तर मदत कार्यास सोपे जाईल.
पिंपरी चिंचवड शहराच्या मध्या भागि असलेले , साई चौकात ,भुयारी मार्ग हा पूर्ण जलमय झाला आहे.हा वाहतुकीच्या दृष्टी ने मुख्य शॉर्ट कट रस्ता आहे.हा रस्ता मुंबई महामार्ग ला जोडणारा रस्ता आहे.अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात.परंतु हा रस्ता जलमय झाल्याने या भागातील वाहतूक व्यास्ता आज ठप्प पडली आहे.
काळेवाडी,व चिंचवड या ठिकाणी स्मशान भूमी परिसरात सत्तर टक्के ,भागात पवना नदी चे पाणी शिरले आहे.हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.तसेच चिंचवड या ठिकाणी मोरया गोसावी मंदिर देखील मोठ्या प्रमाणावर पवना नदी हेरले आहे.मंदिराचे संपूर्ण परिसर हा जलमय झाले आहे.या ठिकाणी फुलं हार विकणारे दुकाने आज बंद होती.
पिंपरी चिंचवड शहरात घरकुल परिसरात रस्त्यावर पाणी जमा झालेले दिसले.संपूर्ण घरकुल परिसरात जिकडे बघू तिकडे पाणीच पाणी दिसत होते. ,याला नदी चे स्वरूप प्राप्त झाले होते.पाण्याची निचरा होत नाही असे नागरीक या ठिकाणी बोलत होते.या ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन निष्क्रिय झाल्याचे दिसते.पिंपरी चिंचवड महानगरपालिका विभागाने येणाऱ्या धोखा लक्षात घेता या ठिकाणी पाण्याचा निचरा कसे होईल या वार काम करून या ठिकाणी असणारे प्रश्न लवकर मार्गी लावावे असे नागरीक मागणी करीत आहे.
मावळ डोंगराळ भागात अतिवृष्टी होत असल्याने पवना धरणात जल साठा प्रमाण हा ७५ ते८० % झाला आहे.पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने नदी काठी राहत असलेल्या नागरिकांनी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून जवळचे शाळा ग्राउंड,इत्यादी ठिकाणी नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे,इस्कॉन सारखे संस्था हे कार्य करीत आहे.नागरीक साठी जेवनची व्यवस्था देखील ते पाहत आहे. मां.आयुक्त पिंपरी चिंचवड नगरपालिका,श्री.शेखर सिंह यांचे आव्हान आहे की जवळ जी जागा आहे तिथे नागरिकांनी स्थलांतरित व्हावे,अथवा आपल्या जवळ चे नातेवाईक कडे जावे.पवना धरणातून होणारा विसर्ग हा मोठा आहे.होणाऱ्या संकट पासून आपले बचावला प्राधान्य देत प्रशासनाला सहकार्य करावे.
Reported by Irfan Shaikh
Cheif editor Nazeer Wagu
8879726577 [email protected]