*विशालगड प्रकरणी दंगल* *करणाऱ्या आरोपींवर#UAPA* *अंतर्गत कारवाई ची मागणी.*


*विशालगड प्रकरणी दंगल* *करणाऱ्या आरोपींवर#UAPA*
*अंतर्गत कारवाई ची मागणी.*

आज दिनांक १८ जुलै रोजी लोकशाही युवा फाउंडेशन(महा.राज्य) व नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे वतीने मां.तहसीलदार पिंपरी चिंचवड पुणे मां.विक्रम देशमुख सो यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ.शिंदे साहेब,तसेच गृह मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,तसेच उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालक मंत्री ,श्री अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदन द्वारे संघटने नी दंगल ग्रस्त लोकांचे पुनर्वसन करावे व प्रती व्यक्ती १० लाख रुपये नुकसान भरपाई तसेच संपूर्ण स्तरावर मालमत्ता आहे तशी करून मिळावी अशी मागणी लोकशाही युवा फाउंडेशन व नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी यांनी केली आहे.

Advertisement

दिनांक १४जुलै रोजी कोल्हापूर,येथील विशाल गड पैथ यशी,असलेले गजापुर या गावात काही अध्यात टोळी ने मोठ्या संख्ये ने या ठिकाणी राहत असलेल्या मुस्लिम गरीब कुटुंबांवर ,व येथील मस्जिद वार बेह्याड हल्ला करून या गरीब कुटुंबांना मारहाण देखील केली आहे.सदर हल्ल्या मुले संपूर्ण देशात या घटने ची विविध संघटने,सामाजिक,राजकीय शेत्रातून निषेध नोंदविला जात आहे.
सदर विषयी लोकशाही युवा फाउंडेशन चे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख यांनी मागणी केली आहे की,या दंगलीत सामील असलेले दोषींवर UNLAWFULL ACTIVITY PREVENSION ACT,म्हणजे UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
तसेच या घटनेस सामील असलेले माजी राज्यसभा सदस्य जी व त्यांचे सहकारी याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी या निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना लोकशाही युवा फाउंडेशन चे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख,पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष युनूस भाई बेग,सामाजिक कार्यकर्ते हाजी गुलाम रसूल,मयूर भाई,गौरव चौधरी,अलीम भाई शेख,उपस्थित होते.

Reported by Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!