*काळेवाडी चोरट्यांचे धुमाकूळ*


*काळेवाडी चोरट्यांचे धुमाकूळ*

Advertisement

काळेवाडी, दिनांक:१७/०७/२०२४ रोजी पहाटे,३.४०मिनिटांनी ,काळेवाडी मुख्य रहदारी चे रस्ता ,या ठिकाणी असलेले रोहन वाईन्स शॉप काही अध्यात व्यक्ती ने कटियार,चे सहाह्याने शटर उचकटून या ठिकाणी चोरी केली.
सदर फिर्याद वाकडं पोलिस चौकी येथे रोहन वाइन शॉप चे मॅनेजर हिमांशू प्रदीप करीरा यांनी नोंदविली.सदर तक्रार मध्ये वाइन शॉप मधील १००००/ रुपये किमतीचे एक सीसीटीव्ही डी वी र मशीन चोरी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच या परिसरात नढे नगर या ठिकाणी ममता ज्वेलर्स या ठिकाणी देखील अध्यात व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.सदर तक्रारीत २०००/रुपये नकद गल्यातून चोरी गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
वाकडं पोलिस स्टेशन मध्ये सदर विषयी ,वाकडं ८१४/२०२४,बी एन एस,३०५,३३१(३),३३१(४),३(५) कलमा अंतर्गत अध्यात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेवाडी भागातील या दोन घटनेनं व्यापारी वर्गात भीती चे वातावरण तयार झाले आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका ,स्मार्ट सिटी अंतर्गत बसलेले कॅमेरा देखील निष्क्रिय ठरले आहे.व्यापारी वर्ग कडून मागणी केली जात आहे की हे सीसीटीव्ही कॅमेरे जे रोहन वाईन्स,ज्योतिबा मंदिर,पांच पीर लवकरात लवकर चालू करण्यात यावे.या परिसरातील नागरिक ,विशेषतः महिला वर्गाला रस्त्यावर येण्या साठी पोषक वातावरण नसल्याने अनेक कुटुंब भीती मध्ये आहे.या ठिकाणी पोलिने गस्त यंत्राने वाढवून नागरिकांना सुरक्षा मिळावी अशी देखील दबक्या आवाजात मागणी होत आहे.

Reported by

Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!