.महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेचे विशेष कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई ची मागणी:Dr.सतीश. कांबळे.


**मुख्यमंत्री कडे *मागणी* *रमेश चव्हाण यांच्या वर*** *निलंबनाची कारवाई त्वरित कारवाई: डॉ.सतीश कांबळे* .

–  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी श्री रमेश चव्हाण यांच्यावर हक्क भंग कारवाई करून सेवेतून हकालपट्टी  केल्यास राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना न्याय मिळेल. !

ई-मेल च्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले ,निवेदनात पुढील म्हटले आहे..

सध्या राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवा मिळणे  खूप भयानक झालेले आहे , खाजगी योजना समाविष्ट रुग्णालय जुन्या पिक्चर मधील डाकू मंगलसिंग चे चोरीचे अड्डे झालेले आहेत, त्यांना भस्म्या आजार जडला आहे , मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची बिलासाठी लूट करताना दिसत आहेत.

Advertisement

आपण सर्व राज्यांमध्ये सर्वच घटकांना पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत मिळतील अशी घोषणा केली , परंतु परिस्थिती त्याच्या विपरीत आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, अपुरे मनुष्यबळ , डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, असल्यामुळे रुग्णांना वेळेत  उपचार मिळत नाहीत याचा थेट परिणाम काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. बऱ्याच वेळा रुग्ण हा खाजगी रुग्णालयात जिथे योजना आहे तिथे दाखल होण्यासाठी जात आहे तिथे परिस्थिती इतकी भयानक की अगोदरच पैसे भरा मगच तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल ? असं सांगण्यात येतं. रुग्ण हा योजनेत समाविष्ट असताना देखील त्याच्याकडून औषधाचे पैसे , इम्प्लांट ,  च्या नावाखाली पैसे लाटले जात आहेत. एक प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. शासनाने नेमून दिलेले योजनेचे कार्यकारी अधिकारी श्री रमेश चव्हाण निव्वळ झोप काढत दिसत आहे , रुग्णालयांशी संगणमत करून  पैसे लुटण्याचा काम त्यांचं चालू आहे. असंख्य तक्रारी यांच्याकडे प्राप्त झाले असून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई रुग्णालयांवरती होताना दिसत नाही. माझी आपल्याकडे विनंती की आपण या विषयाला गांभीर्याने घ्यावे व उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याची चौकशी चे आदेश द्यावेत व या भ्रष्ट अधिकाऱ्यावर हक्कभंगाची कारवाई करून या अधिकाऱ्याला कामावरून बडतर्फ करावे. जेणेकरून  सर्व राज्यातील योजना समाविष्ट रुग्णालय व्यवस्थित काम करतील त्यांच्यावरती चपराक बसेल  व सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी दिलासा मिळेल.अशी माहिती शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र चे राज्य प्रमुख ,Dr.सतीश कांबळे यांनी W…न्यूज चॅनल ल दिली,व राजेंद्र चव्हाण,जन आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी यांच्यावर हॅक भंग कारवाई करीत ,त्यांना निलंबन करावे अशी मागणी ,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,श्री.एकनाथ.शिंदे यांच्या कडे केली आहे.

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!