*कोल्हापूर विशाळगडावर ,दगड *फेक,मारहाण,धार्मिक स्थळांना* *नुकसान* , *सकल मुस्लिम *** *समाजा तर्फे#* *UAPA** *अंतर्गत कारवाई ची* *मागणी.**
*कोल्हापूर विशाळगडावर ,दगड *फेक,मारहाण,धार्मिक स्थळांना*
*नुकसान* , *सकल मुस्लिम *** *समाजा तर्फे#* *UAPA** *अंतर्गत कारवाई ची* *मागणी.**
सकल मुस्लिम समाज समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने दिनांक १९ जुलै २०२४,रोजी सदर निवेदन सविनय सादर केले गेले. १)माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. २)माननीय उपमुख्यमंत्री व पालकमंत्री पुणे जिल्हा.३) माननीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य ४) माननीय जिल्हाधिकारी पुणे .५)माननीय अप्पर तहसीलदार हवेली जिल्हा पुणे यांच्या मार्फत सविनय सादर) केले गेले:
दिनांक १४ जुलै रोजी विशाळगड व गजापूर गावामध्ये मस्जिद व मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे बाबत..विनंती यात करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी विषयावर विशाळगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गा मस्जिद वर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर भ्याड हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये दर्गा व मज्जिद चे तसेच मुस्लिम लोकांच्या घरांचे व दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे या भ्याड कृतीचा आम्ही सर्वप्रथम तीव्र निषेध करतो व ही कृती करणाऱ्या भ्याड हल्लेखोरांचा धिक्कार करतो विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दर्गा हे सर्व धर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे तेथील हजरत मलिक रेहान बाबांच्या दर्गावर हिंदू मुस्लिम भाविकांची भक्ती आहे येथील दर्गा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत माननीय न्यायालयाने स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी ,रवींद्र पडवळ, बंडा साळुंखे यांनी चिंतावणी दिल्यामुळे जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशाळ गडावरील पवित्र दर्गावर दगडफेक केली हे वाईट कृत्य करून देखील गप्प न बसता दंगेखोरांनी विशाळगडावून परतताना गडाशेजारील गजापूर या गावामधील मस्जिद तसेच मुस्लिम लोकांवर आणि त्यांच्या घरावर दुकानावर गाड्यावर भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोक गंभीर रित्या जखमी झालेले आहेत हा हल्ला पूर्वनियोजित होता व सदर हल्ल्यापूर्वी पुणे शहरात मीटिंग घेण्यात आली होती व हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते सदर हल्ल्या करिता पुणे व सांगली जिल्ह्यातील तरुणांची माती भडकावून त्यांना दंगली करिता प्रोत्साहन देण्यात आले असे कळते सदरबाबत पोलीस दलाच्या पुणे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गुप्तचर यंत्रणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे वाटते अशी कृत्य महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात वारंवार होत असताना देखील पोलीस प्रशासन ना कडून कडक कार्यवाही होत नसल्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढत चालले आहे तरी आपणास समृद्ध विनंती आहे सदर दंगलीस कारणीभूत असणाऱ्या दंगली करिता तरुणांची माती भडकावणाऱ्या व दंगल करून दहशत माजवणाऱ्या व मुस्लिम समाजाच्या घराचे धार्मिक स्थळांचे वाहनांचे नुकसान करणाऱ्या प्रवृत्तींना शोधून त्यांच्यावर यु ए पी ए कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात यावी दंगलीमध्ये ज्या निष्पाप घराचे वाहनांचे नुकसान झाले आहे त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी जे जखमी आहे त्यांना पाच लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी ज्या धार्मिक स्थळांचे नुकसान झाले आहे त्या धार्मिक स्थळाची दुरुस्ती शासकीय खर्चाने करण्यात यावी यापुढे अशा घटना घडू नये याकरिता मुस्लिम समाजाच्या संरक्षणाकरिता एट्रोसिटी सारखा कडक कायदा करण्यात यावा अन्यथा सर्व संविधान प्रेमी लोकांतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे सकल मुस्लिम समाजा तर्फे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन देते वेळेस प्रमुख उपस्थिती मध्ये
सालार शेख, इस्लामुद्दीन ,गुलाम मोहम्मद, T A खान, जुबेर खान, गुलजार शेख ,हारून शेख ,हाजी गुलाम रसूल, याकूब शेख, या अकबर शेख, हमीद मुलानी, हाफिज मोहम्मद, नजीर भाई वागू,इरफान.शेख, आसिफ शेख, शफीउल्ला काजी, खुर्शीद शेख , जाफर मुल्ला, शहाबुद्दीन शेख, ईसुफ कुरेशी ,खाजाभाई नदाफ, अखिल मुजावर, वहाब शेख, रशीद आतार, इत्यादी मुस्लिम समाज उपस्थित होते.
Reported by Irfan Shaikh