*पोलिस खंडणी विरोधी विभागाची सोशल मीडिया वर कर्डी नजर.*
*पोलिस खंडणी विरोधी विभागाची सोशल मीडिया वर कर्डी नजर.*
मा.पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाउंट वर वॉच ठेवणेबाबत दिलेल्या आदेश व सूचना प्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अंमलदार रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचे इंस्टाग्राम अकाउंट चेक करत असताना पोलिस हवालदार गणेश गिरिगोसावी,यांना एका इसमाने हातात दोन कोयते घेऊन दहशत मजविण्याच्या उद्देशाने फोटो टाकल्याचे निर्धश्णास आले. सदर बाबत त्यांना व पो नी संतोष पाटील यांना कळविले.
व.पो.नी श्री.संतोष पाटील यांनी खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांची टीम तयार करून सदर इसमाने शोध घेत असताना पोलिस अंमलदार,गणेश गिरीगोसावी,निशांत काळे व रमेश गायकवाड यांना त्याचे बातमीदार कडून माहिती मिळाली की फोटो मधील इसम हा त्यांचे साथीदार सहित साखरे वस्ती हिंजवडी येथील पडक्या रो हाऊस मध्ये बसलेले असून ते घातक शस्त्रसहा दरोडा घालण्याची तयारी करीत आहे.खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी त्वरित जाऊन छापा घातला. छाप्या मध्ये १) विष्णू दिगंबर पवार,वय २०वर्ष, रा.वडगाव मावळ,२) करणं.राहुल.लोखंडे , रा.काळा खडक,वाकडं,यांना अटक करून, , त्यांच्या ताब्यातून ०२ लोखंडी कोयते,०१ पालघन व मिरची पूड व दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच ऋषिकेश जाधव ,व बाबू शेख रा.काळाखडक,वाकडं हे पोलिस आल्याची चाहूल लागल्याने पळून गेले.पोलिस त्यांचा तपास करीत आहे.त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलिस स्टेशन. गुरनं ८८९/२०२४ भान्यास ३१०(४) आर्म ॲक्ट ४(२५), म.पो. अधि.क.३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्यांच्या कडील अधिक तपास करता,त्यांनी हिंजवडी पोस्टे. गुरनं ८९०/२०२४ भान्यास ११०,१२७(२),१३१,१८९(२),१८९(४)१९१(३)१९०,११५(२),३२४(२)३५१(२),३५२,क्री. ॲ.ॲक्ट.क.७, आर्म ॲक्ट ४(२५),म.पो.ॲक्ट,३७(१)(३) सह.१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची उघडकीस आला आहे.आरोपींवर जबरी चोरी,गंभीर दुखपटकरणे,अवैध शस्त्र बाळगणे,मारहाण करणे चोरी करणे असे ,७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर कारवाई ही पोलिस आयुक्त.श्री विनय चौबे, मां.पोलिस सह.आयुक्त.श्री शशिकांत.महावरकर, मां पोलिस उप आयुक्त(गुन्हे) संदीप.डोईफोडे,सह.पोलिस आयुक्त(गुन्हे) डॉ.विशाल हिरे,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.संतोष.पाटील व पोउनी,सुनील. भदाणे,पोलिस अमलदार,रमेश.गायकवाड, निशांत. काळे,किरण.काटकर, गणेश.गिरिगोसावी, व प्रदीप.गायकवाड,यांच्या पथकाने केली.
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu
8879726577