*पिंपरी चिंचवड युनिट३ ची जब्बर कारवाई.* *तब्बल१२ तासात आरोपी जेरबंद.*


Lo

*पिंपरी चिंचवड युनिट३ ची जब्बर कारवाई.*
*तब्बल१२ तासात आरोपी जेरबंद.*

दिनांक २८/७/२४ रोजी रात्री २३.१५ वाजता क्राईम कंट्रोल कडून प्राप्त संदेश प्रमाणे म्हाळुंगे M.I.D.C, पोलिस ठाणे हद्दीत अंबेठान येथे एका मुलीचे गळवावर चाकूने वार करून खुन झाल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड व युनिट३ चे पथक तत्काळ घटना स्थळी पोहचले.

Advertisement

प्राची विजय माने,वय: २१,मूळ गाव उरण,इस्लामपूर,जिल्हा: सांगली,सध्या अंबेठान,तालुका खेड,जिल्हा:पुणे येथे राहत होती.एक तर्फी प्रेमातून इसमाने अविरज खरात यांनी प्राची यास लग्नाची मागणी केली असताना तिने नकार दिला. सदर इसमाने रागाच्या भरात,चिडून तिची हत्या केली.गल्वावर व पोटावर वार करून प्राची ची निर्घृण हत्या केली गेली.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिचे मोबाईल आपल्या बरोबर घेऊन फरार झालं.
युनिट ३ चे पथक शोध घेत असताना अशी माहीत मिळाली की सदर इसम हा सातारा हायवे नी टू व्हीलर पल्सर गाडी क्रमांक एम. एच. १०ई एफ ४१५४ वारून प्रवास करीत आहे.युनिट ३चे पथकाने त्वरित,रित्या कोणते ही वेळ न घालवता सातारा कराड नॅशनल हायवे क्रमांक ४,वार सापळा रचीत त्याचा पाठलाग केला. सदर कारवाईत दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर पाठलाग करून आरोपी अविराज.रामचंद्र.खरात राहणार बहे,तालुका:वाळवा,जिल्हा:पुणे यास तीन मोबाईल व पल्सर गाडी सहित ताब्यात घेतला व म्हाळुंगे पोलिस ठाणे यांच्या ताब्यात दिला.
अश्या प्रकारे आरोपी बाबत एक ही पुरावा नसताना गुन्हे शाखा युनिट३चे पिंपरी चिंचवड कडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण समांतर तपास करून व माहिती करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचे कौशल्यपूर्ण वापर करून सदर गुन्हा उगडकिस आणला आहे.

सदर कारवाई ही पोलिस आयुक्त.श्री विनय चौबे, मां.पोलिस सह.आयुक्त.श्री शशिकांत.महावरकर, मां पोलिस उप आयुक्त(गुन्हे) संदीप.डोईफोडे,सह.पोलिस आयुक्त(गुन्हे) डॉ.विशाल हिरे,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड व त्यांच्या टीम यांनी केली आहे.

Reported by Irfan Shaikh

Chief editor Nazeer Wagu

8879726577

[email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!