अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी पिंपरी चिंचवड * *दिघी मध्ये गांजा विक्री करण्याकरीता आलेले दोन इसम 6 किलो गांजासह ताब्यात,दुचाकीसह 5G सुमारे 4 लाखाचा मुद्देमाल जप्त*
*अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी*
*दिघी मध्ये गांजा विक्री करण्याकरीता आलेले दोन इसम 6 किलो गांजासह ताब्यात,दुचाकीसह 5G सुमारे 4 लाखाचा मुद्देमाल जप्त*
आदरणीय सर,
आज दि 09/01/2025 रोजी अंमली पदार्थ विरेाधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड कडील सपोनि सचिन कदम, पोलीस अंलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, गणेश कर्पे, विजय दौंडकर, निखिल वर्पे असे दिघी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *पोलीस अंमलदार विजय दौंडकर व जावेद बागसिराज* यांना मिळालेल्या बातमीवरुन *इसम नामे 1. गौरव यशवंत नवले, वय 21 वर्षे, रा मु.पो. सारोळा सोमवंशी, विसापुर जवळ, ता श्रीगोंदा जि अहमदनगर व 2. महेश भाऊसाहेब आढाव, वय 21 वर्षे, रा सदर* यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन *एकुण 3,90,500/- किंमतीचा माल ज्यामध्ये 6410 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, 02 मोबाईल व आर.टी.ओ. क्र एम.एच.16/सी.झेड./2216 असा असलेली काळे रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस हि दुचाकी* जप्त करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द दिघी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त्)(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविनय सादर,
*(संतोष पाटील)*
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अंमली पदार्थ विरोधी पथक,
गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
W News channel. 8879726577
Chief Editor Nazeer Wagu
Reported by Irfan Shaikh