भोसरी परिसरामध्ये अवैध गॅस रिफिल करणारे 02 इसम 2,46,530/- किंमतीचे 68 गॅस टाक्यांसह ताब्यात*
भोसरी परिसरामध्ये अवैध गॅस रिफिल करणारे 02 इसम 2,46,530/- किंमतीचे 68 गॅस टाक्यांसह ताब्यात*
*अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी*
*भोसरी परिसरामध्ये अवैध गॅस रिफिल करणारे 02 इसम 2,46,530/- किंमतीचे 68 गॅस टाक्यांसह ताब्यात*
आदरणीय सर
आज दि 16/01/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेकडील सपोनि सचिन कदम, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, विजय दौंडकर, अजित कुटे व चिंतामण सुपे असे भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *पोलीस अंमलदार विजय दौंडकर व जावेद बागसिराज* यांना मिळालेल्या बातमीवरुन *इसम नामे 1. अजय धर्मराज सकुंडे, वय 27 वर्षे, रा संकल्प वास्तु बिल्डींग, डी. विंग, फ्लॅट क्र 1305, चहोली फाटा, ता हवेली जि पुणे मुळ रा सावतामाळी मंदिराचे जवळ, वाघळवाडी, ता बारामती, जि पुणे व 2. अमोल हनुमंत जाधव, वय 28 वर्षे, रा सदर* हे त्यांचेकडे कसलाही परवाना नसताना घरगुती वापराचे भरलेल्या गॅस सिलेंडर मधुन रिफीलच्या सहाय्याने व्यवसाईक गॅसचे टाकीमध्ये गॅस भरत असताना मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन *एकुण 2,46,530/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये एकुण 35 घरगुती वापराचे, 33 व्यावसायिक गॅस सिलेंडर, वजन काटा, गॅस रिफिल करण्याचे साहित्य (लोखंडी पिन 08) व मोबाईल* असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचेविरुध्द भोसरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहीता कायदा कलम 287, 288 सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा 1955 चे कलम 3,7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविनय सादर,
*(संतोष पाटील)*
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
अंमली पदार्थ विरोधी पथक,
गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
Chief Editor:Nazeer Wagu(8879726577)
Reported by:Irfan Shaikh