*पिंपरी चिंचवड शहरात* *ट्रॅफिक नियम धाब्यावर*


झेब्रा क्रॉसिंगचा नियम केवळ कागदावरच
रस्त्यांवर असलेले झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी असून ते त्यांना वापरता यावेत म्हणून किमान झेब्रा क्रॉसिंगवर तरी आपण वाहने उभी करू नयेत हा साधा नियमही आपण पाळणारच नाही अशी मानसिकता पुणेकर वाहनचालकांमध्ये दिसते.

*नियम काय आहे?*

याबाबत नियमावलीही करण्यात आली आहे. लाल सिग्नल असताना वाहनचालकांना रस्त्यावर केलेल्या पिवळ्या पट्टीच्या मागे गाडी उभी करावी लागते आणि त्या पट्टीसमोर झेब्रा क्रॉसिंग केले जाते. जेणेकरून पादचाऱ्यांना ते ओलांडता येईल.

*जीव मुठीत धरून पादचारी ओलांडताहेत रस्ता*

रस्त्यांवर असलेले झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी असून ते त्यांना वापरता यावेत म्हणून किमान झेब्रा क्रॉसिंगवर तरी आपण वाहने उभी करू नयेत हा साधा नियमही आपण पाळणारच नाही अशी मानसिकता पिंपरी चिंचवड वाहनचालकांमध्ये दिसते.

सिग्नल हिरवा होण्यास अगदी दहा सेकंद उरलेले असले तरी वाहनचालक जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. अनेकदा सिग्नल हिरवा होण्यापूर्वीच सिग्नल तोडून वाहनचालक पुढे निघालेले सर्रास दिसतात. एखाद्या वाहनचालकाने सिग्नलचा नियम पाळायचा असे ठरविले असेल तर त्याला मागे टाकून पुढे जाणारे त्याला अक्षरशः वेड्यात काढताना दिसतात.

Advertisement

रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथची अवस्था काय आहे हे वेगळे सांगायची कोणाला गरजच नाही. चौक ओलांडताना पादचाऱ्यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होतात. रस्ता ओलांडताना अनेकदा झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करण्यात आलेली असतात. त्यात सिग्नल न पाळण्याची शर्यत लागलेली असल्यामुळे रस्ता क्रॉस करत असलेल्या लोकांवरच ओरडत वाहनचालक निघून जातात. सिग्नल हिरवा होईपर्यंतही वाट पाहण्याची सोशिकता अनेकदांमध्ये पाहण्यास मिळत नाही.सिग्नल सुटला की कौन पहले क्रॉस करते याची स्पर्धा पहिला मिळते.

झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असलेल्या पहिल्या लाइनवर आपले वाहन उभे करायला पाहिजे हे केवळ नियमांमध्येच राहिले आहे. रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी असलेले नियम आपण स्वतःिहून पाळले तर वाहतूक कोंडीची समस्या थोडी तरी कमी होईल.

*जनहितार्थ!सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.*

 

*ही बातमी लावण्या मागचे आमचे *उद्दिष्ट ,पिंपरी चिंचवड* *शहरातील ट्रॅफिक व्यवस्था *ला शिस्त लागणे,व पादचाऱ्यांना न्याय मिळने आहे.ही बातमी*जनहितार्थ!*आहे.*

Reported by Irfan Shaikh

Chief editor Nazeer Wagu

8879726577

[email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!