पिंपरी विधानसभा मधून AIMIM पक्षाकडून उमेदवारी साठी मा.अंजना गायकवाड( शिंदे) ( पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष ) यांनी मा. अकील भाई मुजावर महासचिव महाराष्ट्र राज्य यांना दिला कार्य अहवाल
पिंपरी विधानसभा मधून AIMIM पक्षाकडून उमेदवारी साठी मा.अंजना गायकवाड( शिंदे) ( पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष ) यांनी मा. अकील भाई मुजावर महासचिव महाराष्ट्र राज्य यांना दिला कार्य अहवालपिंपरीतून एमआयएम पिंपरी विधानसभा मधून निवडणुकीच्या उमेदवारी साठी मा. अंजना
ताई गायकवाड( शिंदे) यांनी अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहेएम आय एम पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव मा. अकील भाई मुजावर यांच्याकडे केली आहे. आपल्या उमेदवारीच्या समर्थनार्थ अनेक पूरक बाबींचादेखील उल्लेख त्यांनी केला आहे.
Advertisementमा. अंजना ताई गायकवाड (शिंदे)हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांनी भिमाकोरेगाव दंगली मध्ये भिडे व एकबोटें यांच्या वर अट्रॉसिटी ऍक्ट चा गुन्हा पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम दाखल केला आहे त्यामधील त्या सहफिर्यादी आहेत तसेच त्यांनी चळवळीत काम करत असताना समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचार यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन वेळोवेळी आवाज उठवला आहे तसेच आर.टी. ई च्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र मध्ये विध्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा व कुठलाही विध्यार्थी शिक्षणा अभावी वंचित राहू नये व शाळेकडून होणारी पालकांची लूटमार या साठी वारंवार आवाज उठवून न्याय दिला आहे तसेच महिलांच्या अडीअडचणी त्या नेहमीच सोडवत असतात
पिंपरी विधानसभा मध्ये त्यांचे चळवळीतील काम व पक्षाचे काम उल्लेखनीय आहे त्यांनी 2017 मध्ये महानगरपालिका ची निवडणूक देखील लढली होती त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केलेले आहे त्यांच्या कडे टीम बांधणी ही प्रभाग नुसार तयार आहे या विधानसभा निवडून येण्यासाठी सर्व तयारी केली आहे अंजना गायकवाड (शिंदे) हा तरुण चेहरा महिलांसाठी प्रेरणादायी आहे त्या सुशिक्षित असल्यामुळे निवडून आल्या तर पिंपरी विधानसभा मध्ये नक्कीच परिवर्तन होऊ शकते अशी लोकांमध्ये चर्चा आहे