**अपना* वतन *संघटनेचा* ** *मुळशी** *तहसील कार्यालयावर, “लाच दो* **आंदोलन* ” .


**अपना* वतन *संघटनेचा* **मुळशी**तहसील कार्यालयावर, “लाच दो* **आंदोलन* ” .

अपना वतन संघटनेच्या वतीने मुळशी तहसील कार्यालयावर ” लाच दो आंदोलन ”
प्रतीकात्मक तहसीलदारांना १ कोटींचा धनादेश सोपवला ; मे सोनिगरा बिल्डरला पावणेदोन कोटींचा दंड
सर्व्हे न २१ , मौजे थेरगाव , सर्व्हे न २१ , २२ याठिकाणी मे सोनिगरा यांचेकडून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक झालेबाबत कारवाई करणेबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी दि २१/१२/२०२३ रोजी लेखी तक्रार केलेली होती. २१/१२/२०२३ रोजी तक्रार दिलेले असताना तब्बल २० दिवसांनी पंचनामा करण्यात आला. तसेच १०/०१/२०२४ रोजी पंचनामा झालेला असताना पुढील सुनावणी संदर्भात तक्रारदार सिद्दिक शेख यांना कसलीही कल्पना देण्यात आलेली नाही. सर्व्हे न २१ , मौजे थेरगाव , सर्व्हे न २१ , २२ याठिकाणी मे सोनिगरा यांचेकडून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक झालेबाबत कारवाई करणेबाबत जाणीवपूर्वक मा. तहसीलदार कार्यालयाकडून प्रचंड टाळाटाळ व दिरंगाई होत असल्याने दि ६/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये तहसीलदार कार्यालय येथे ” लाच दो आंदोलन ” करण्याबाबत कळविण्यात आलेले होते . त्यानुसार आज मुळशी तहसील कार्यालय येथे प्रतीकात्मक ” लाच दो आंदोलन ” करण्यात आले . यावेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक तहसीलदारची नोटांचा हार घालून मिरवणूक काढण्यात आली. तसेच १ कोटी रुपयांचा प्रतीकात्मक धनादेश सुपूर्द केला.यावेळी नायब तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई केलेबाबतचे लेखी पत्र संघटनेला दिले .आंदोलनावेळी अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांनी सांगितले कि, तहसीलदार यांनी मे सोनिगरा यांना १ कोटी ८७ लाख रुपयांचा दंडात्मक आदेश काढला आहे . परंतु हा सर्व बनवाबनवीचा प्रकार असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. कारण २५/०७/२०२४ च्या आदेशाचे अवलोकन केले असता त्यामध्ये एकूण अनधिकृत गौणखनिज उत्खनन ९६८९ नमूद केलेलं असून , ५००० ब्रास साठी परवानगी घेतल्याचे सांगितले आहे . परंतु या परवानग्या नियमानुसार ग्राह्य धरता येत नाहीत. हा निव्वळ डोळ्यात धूळफेक करणायचा प्रकार आहे . कारण या ठिकाणी एकूण ६ इमारतींचे बांधकाम चालू होते . परंतु तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे करोडोंचा महसूल बुडालेला आहे . यावरून तहसील कार्यालयामार्फत मे सोनिगरा यांना पाठीशी घातले जात असल्याचे सिद्ध होत आहे . तसेच यापूर्वी ५ इमारतीच्या गौणखनिज उत्खनन बाबत सुद्धा कसलीही कारवाई करणेत आलेली नसलेने जाणीवपूर्वक बिल्डरच्या नियमबाह्य व चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणाऱ्या तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी तसेच , क्षेत्रीय अधिकारी यांचेवर कारवाई करणेत यावी. तसेच मे सोनिगरा यांच्यावर दंडात्मक कारवाईचा सुधारित आदेश काढण्यात यावा . तसेच मे सोनिगरा यांनी शपथपत्रात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केलेप्रकरणी त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणेत यावा .

Advertisement


यावेळी तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार डॉ . प्रियांका मिसाळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली व सुधारित आदेश काढण्याचे आश्वासन दिले . यावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे , सचिव दिलीप गायकवाड , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , बंटी बुचडे , विकास पांडागळे , कय्युम पठाण , शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले , दिनेश भाऊ चव्हाण , फातिमा अन्सारी , तौफिक पठाण , वसिम पठाण , मलंग शेख , , लक्ष्मण पांचाळ , संदीप कोल्हे , आदीजण उपस्थित होते

W News Channel  8879726577

[email protected]

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!