*लोकसभेत विरोधकांचा वक्फ* *दुरुस्ती विधेयकाला विरोध.*


*लोकसभेत विरोधकांचा वक्फ*
*दुरुस्ती विधेयकाला विरोध.*

संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक(२०२४) मांडण्यात आला.संसदेत या विषयी सर्व विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला असताना.अल्पसंख्यांक केंद्र मंत्री किरण रिजिजु म्हणाले,वक्फ बोर्ड कायद्या मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे,त्यांनी या वेळी काँग्रेस पक्षाला टार्गेट करीत त्यांना या विधेयकाला समर्थन दिले पाहिजे कारण या दुरुस्ती त्यांचे सरकार असताना त्यांनी सुचविलेले काही मुद्दे त्यांच्या सरकार चे काळातील आहेत.

केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले की वक्फ (दुरुस्ती) विधेयक,२०२४ चे छाननीला सरकारचा कोणताही आक्षेप नाही आणि ते चर्चे साठी संयुक्त संसदीय समिती कडे,(जेपीसी) कडे पाठविण्याची शिफारस करत आहेत.
“आम्ही छाननी आणि चर्चे खुले आहोत.आम्ही पळून जात नाही.जार हे जायचे असेल तर ते जे पी सी कडे गेले पाहिजेत आणि आम्ही त्यावर सविस्तर चर्चा करू शकतो.जे पी सी स्थापना झाली पाहिजे असे अल्पसंख्यांक मंत्री, किरण रीजिजू म्हणाले.

*वक्फ दुरुस्ती विधेयक ला विरोध*
*प्रतिक्रिया:*

Advertisement

एआयएमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र शासन वर देशाचे विभाजन करून
मुस्लिमांना लक्ष करण्याचे आरोप केला आहे.”हे विधायक घटनेच्या कलम १४,१५आणि२५, चया तत्वांचा उल्लंघन करते.
हे विधायक भेदभाव पूर्ण आणि मनमानी आहे…हे विधायक आणून तुम्ही(केंद्र सरकार)राष्ट्राला एकसंध न ठेवता विभाजित करण्याचे काम करत आहात.तुम्ही मुस्लिमांचे शत्रू आहात याचा पुरावा हे विधायक आहे.

*काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल*

के सी वेणुगोपाल यांनी या विधेयकाला संघीय व्यावस्तेवरील हल्ला म्हटले आहे.
आम्ही हिंदू आहोत पण त्याच वेळी आम्ही इतर धर्माच्या श्रध्देचा आदर करतो.हे विधेयक महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीसाठी खास आहे.तुम्हाला हे समजत नाही का गेल्या वेळी भारतातील जनते तुम्हाला स्पष्टपणे धडा शिकवला होता.

*हज असोसिएशन* *ऑफ* *इंडिया*

यांनी वक्फ(दुरुस्ती ) विधेयकाचा स्वागत केले आहे.हज असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष ए.अबुबकर म्हणाले की हे विधायक महिला सक्षमकरणासाठी चांगले आहे आणि गरीब लोकांना मदत करेल.

“हज असोसिएशन ऑफ इंडिया,नावी दिल्लीच्या वतीने,आम्ही या दुरुस्तीचे स्वागत करतो कारण हा कायदा खूप जुना आहे.सध्याच्या परिस्थितीनुसार, काही सुधारणा करणे आवश्यक आहे.भारत सरकारने एक मोठा पुढाकार घेतला आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो,यात काही शंका नाही की काही संघटना आणि राजकीय पक्ष संपूर्ण भारताच्या पातळीवर विरोध करीत आहेत,परंतु मला वाटते की हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी चांगले होईल आणि गरीब लोकांना मदत मिळेल.

W News Channel  8879726577

[email protected]

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!