*सुट्टीच्या दिवशी हिंजवडी मार्गिका लवकर पूर्ण करण्यासाठी 24/7 मेट्रोचे काम करण्याचे अजित पवारांचे आदेश.*
*सुट्टीच्या दिवशी हिंजवडी मार्गिका लवकर पूर्ण करण्यासाठी 24/7 मेट्रोचे काम करण्याचे अजित पवारांचे आदेश.*
पुणे:सुट्टीच्या दिवशी हिंजवडी मार्गिका लवकर पूर्ण करण्यासाठी शिवाजीनगर ते औंध सेक्शनवर 24/7 मेट्रोचे काम करण्याचे अजित पवारांचे आदेश.
परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक डबलडेकर उड्डाणपुलाच्या खाली रस्त्यांची स्थिती राखणे महत्वाचे आहे यावरही त्यांनी भर दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 मार्ग प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.शिवाजीनगर औंध विभागातील कामाला गती देण्यासाठी त्यांनी पोलिसांना २४ तास गर्डर टाकणे व इतर बांधकामांना सार्वजनिक व इतर सरकारी सुट्टीच्या दिवशी परवानगी देण्याचे निर्देश दिले.एकस परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक डबलडेकर उड्डाणपुलाच्या खाली रस्त्याची स्थिती राखणे महत्त्वाचे आहे यावर ही त्यांनी भर दिला.
मेट्रोच्या कामामुळे रस्ते किव्वा ड्रेनेज लाईन चे कोणते ही नुकसान झाल्यास नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे,रस्त्याची बिघडत चाललेली स्थिती या मुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.हे कमी करण्यासाठी ,मेट्रोच्या खाली रस्ते आणि नाल्यांच्या तातडीने दुरुस्तीला प्राधान्य दिले पाहिजे,या मुदतीचा पालन न करणाऱ्या कंपंन्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
याव्यतिरिक्त पवार यांनी बाणेर आणि पाषाण रॅम्पवर सतत काम करण्याचे आवाहन केले,पोलिस विभागाने मेट्रो कामगारांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी २४तास काम करण्याचे परवानगी दिली.हे देखील अधोरेखित करण्यात आले की कोणते ही रस्ते वाळवलेल्या दुरीना बांधकाम योग्य रित्या ठेवले पाहिजे.
W News channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu