इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल दापोडी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
Advertisementइक्रा इंग्लिश मीडियम स्कूल दापोडी सालाबाद प्रमाणे सलग तेराव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला यावेळी शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनी अल्फिया पटेल 85 टक्के गुण, तू तौकल आनम79.80 टक्के गुण व शेख मिसबा76.20 टक्के गुण मिळवून यांचा सत्कार समारंभ ट्रॉफी देऊन माननीय आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमर गाझी संस्थेचे सचिव सलीम शेख शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मिन सय्यद , उद्योगपती मुक्तबा लोखंडवाला सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे ,रवी भाऊ कांबळे, अविनाश कीर्तीकर व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या गीत गायनाने झाली यावेळेस आमदार अण्णा बनसोडे मुलांना मार्गदर्शन केले व भविष्यात शाळेला व मुलांना येणाऱ्या अडचणीमध्ये मदत करण्याची आश्वासन दिले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाची शेवटी मुलांना व पालकांना खाऊ व चहा देण्यात आला
Reported by
Ghulam Rasul sayed