मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीची घोषणा, गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीची घोषणा, गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर
राज्यातील गणेश भक्तांसाठी गुड न्यूज आहे. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने सर्व गणेश भक्तांना टोल माफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर गणेश भक्तांना टोल माफी दिली जाणार आहे. राज्य सरकाराच्या वतीने जीआर काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसना टोल नाक्यावर मोफत सोडले जाणार आहे. तसेच फ्री पाससाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu