काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश
काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुश्ताक अंतुले यांचं पक्षात स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात अजितदादांच्या रुपानं विकास करण्याची एक शक्ती उभी राहिली आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं यावेळी मुश्ताक अंतुले म्हणाले. अनेक वर्ष मी सुनिल तटकरे यांचं काम पाहतोय. अंतुले साहेबांनी ज्या योजना आखल्या होत्या त्या सुनिल तटकरे पूर्ण करत आहेत. अंतुले साहेबांसारखीच कामाची धमक सुनिल तटकरे यांच्यामध्ये लोक पाहत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरेच विजयी होणार आहेस असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Advertisementमुश्ताक अंतुले यांच्यासह अनेकजण आपल्या विचारांसोबत येत आहेत याचा अर्थ अजितदादांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारापासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी टिकाकारांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अल्पसंख्याक समाज नाराज असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे हे सुनिल तटकरे यांनी निक्षून सांगितले.
यावेळी मुश्ताक अंतुले यांच्यासोबत अॅड. विलास नाईक यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ, कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, प्रदेश सरचिटणीस ना. शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष ना. रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष ना. समीर भुजबळ, वाय. बी. त्रिवेदी, राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, अल्पसंख्याक विभागचे राष्ट्रीय अध्यक्ष सैय्यद जलालुद्दीन, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.