*दिनेश वाघमारे राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर राज्यपालांचे शिक्कामोर्त*
दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार नाही
**कोण आहेत दिनेश वाघमारे?*
दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी आहेत. चे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९४ सालच्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत २९ हून अधिक वर्षांपासून सेवा देत आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यातील महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांनी १९९६ साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पुढे राज्यातील विविध विभागातील महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. वित्त, जमीन, उर्जा इत्यादी विभागातील अनेक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात पूर्ण केले आहेत.
वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आय.आय.टी. खरगपूरचे एम. टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एम. एस्सी. केले आहे. त्यांना संघबांधणी, प्रकल्प नेतृत्व, प्रशासन आणि व्यवस्थापन यांचा मोठा अनुभव आहे.
Chief Editor: Nazeer Wagu. 8879726577 Report by: Irfan Shaikh