**वस्ताद कुठला डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष!* : *सोशल मीडियावर अक्षरशः पोस्टचा पाऊस**


**वस्ताद कुठला डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष!*
: *सोशल मीडियावर अक्षरशः पोस्टचा पाऊस**

पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीच्या जडण-घडणीत आणि जगदविख्यात हिंजवडी आयटी पार्कचे जनक शरद पवार साहेब यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला आपण विजयी करावे. ह्या विजयाची नांदी पवार साहेब आहेर गार्डन येथील सभेतुन करणार आहेत. त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
*– राहुल कलाटे*

Advertisement

*महाविकास आघाडीची ‘पंचसूत्री’*
महिलांना दरमहा ३००० रुपये देणारी ‘महालक्ष्मी योजना’, कृषी समृद्धी, बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार भत्ता, कुटुंब रक्षणार्थ २५ लाखांचा आरोग्य विमा कवच, सामानतेची हमी या लोकसेवेच्या पंचसूत्रीला महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात विशेष स्थान देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर चिंचवडच्या गरजा लक्षात घेऊन राहुल यांचे ‘अभिवचन’ साकारले आहे.
चिंचवडमध्ये गेली अनेक वर्ष त्याच त्याच समस्या भेडसावत आहेत. सर्व समस्यांमधून ‘स्वातंत्र्य’ मिळवून जनतेच्या मदतीने ‘चिंचवडचा शाश्वत विकास’ साधण्यासाठीचे हे अभिवचन आहे. “भय आणि भ्रष्टाचारापासून सुटका, २४ तास मुबलक पाणी, वाहतूक कोंडीपासून सुटका आणि उत्तम रस्ते, वीज, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कला – क्रीडा – शिक्षण” अशा प्रमुख पण मूलभूत मुद्द्यांचा समावेश या अभिवचन नाम्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर हा जाहिरनामा चिंचवडकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

W News channel.       8879726577

[email protected]

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!