अझाम भाई यांच्या नेतृत्वात झालेल्या” स्नेह मेळाव्यात”मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला.*


*आज अझाम भाई यांच्या नेतृत्वात झालेल्या” स्नेह मेळाव्यात”मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला.*

मुस्लिम बांधवांंच्या विविध मागण्या हा त्यांचा हक्क असून तिनही आमदार निवडूण येताच सर्व प्रश्न मार्गी लावणार ः अजित गव्हाणे, डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर, राहुल कलाटे यांचे सामुहिक आश्वासन

0999

Advertisement

 


चिंचवड १८ ः पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने चिंचवड येथील बॅन्क्वेट हॉलमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांचा स्नेहमेळावा आज संपन्न झाला. सदर स्नेहमेळाव्याला ज्येष्ठ नेते आझम पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शहरातील मौलाना, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर, चिंचवड विधानसभेचे राहुल कलाटे, शिवसेनेचे माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार आदी पक्षाचे पदाधिकारी व मौलाना व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. पानसरे यांच्या हस्ते भव्य मोठा गुलाब फुलांचा हार तीनही उमेदवारांना एकत्रित घालण्यात आला. यावेळी गुलामअली भालदार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाचे आज या शहरात भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा क्षेत्रात अंदाजे ३ लाखाहून अधिक मतदार स्थायिक झालेले असून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना दैनंदिन जीवनात भेडसावणार्‍या समस्या मांडल्यात आल्या. सांस्कृतिक भवन, उर्दू शाळा व कॉलेजची निर्मिती, दफनभूमीसाठी जागा, राजकीय सत्तेत वाटा, मजिद व मदरसे आदी मागण्या उपस्थितांना वाचुन दाखविण्यात आल्या. उपस्थितांनी एकमुखी मंजूरी दिल्यानंतर तसे निवेदन तीनही उमेदवारांना देण्यात आले. त्यावेळी मागण्यांना उत्तर देताना श्री. गव्हाणे व आदी उमेदवरांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना तीनही उमेदवारांना निवडूण आणण्याचे आवाहन केले. त्याला मुस्लिम बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना अब्दुल गफुर, गुलामअली भालदार यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमजान अत्तार, इम्रान बिजापूर, गुलामली भालदार, आरिफ शेख, झिशान सय्यद, मोहम्मद अली सय्यद, साहिद सय्यद, तौफिक तांबोळी, अन्वर उर्फ पापा सय्यद, असिफ सय्यद, मुन्ना शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
—————–***——————

W News channel.  8879726577

[email protected]

Chief Editor Nazeer Wagu

Reported by Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!