*तेजस खांदार यांचा हरवलेला लॅपटॉप परत मिळाला.मां.मुबिन.कुरैशी * *(सामाजिक कार्यकर्ता) यांचे* *सामाजिक बांधिलकी चे दर्शन**
*तेजस खांदार यांचा हरवलेला लॅपटॉप परत मिळाला.मां.मुबिन.कुरैशी* *(सामाजिक कार्यकर्ता) यांचे* *सामाजिक बांधिलकी चे दर्शन**
मा. तेजस खांदार यांचा हरवलेला लॅपटॉप परत मिळाला
कुरेशी फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श!
अमरावती येथील मा. तेजस खांदार यांचा हरवलेला लॅपटॉप कुरेशी फाउंडेशनचे सक्रिय कार्याध्यक्ष मा. मुबीन कुरेशी यांना दि. ०२/०१/२०२५ रोजी सापडला होता. फाउंडेशनच्या वतीने तातडीने प्रामाणिकता दाखवत तेजस खांदार यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला.
संपर्क मिळाल्यानंतर मा. तेजस खांदार हे अमरावतीहून पिंपरी चिंचवड येथे आले. दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी कुरेशी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. इरशाद जाकीर कुरेशी यांच्या हस्ते त्यांचा लॅपटॉप सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
या प्रसंगी मा. इरशाद जाकीर कुरेशी यांनी सांगितले की, “हरवलेल्या वस्तू परत करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. कुरेशी फाउंडेशन सदैव जनहितासाठी तत्पर राहील.”
Reported by Irfan Shaikh