*पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा ३ आणि ४ एप्रिलला विस्कळीत राहणार*
*पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा ३ आणि ४ एप्रिलला विस्कळीत राहणार*
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धिकरण केंद्र व क्षेत्रिय स्तरावरील पाणीपुरवठा व विद्युत विषयक दुरुस्तीची विविध कामे करावयाची असल्यामुळे गुरुवार दि. ०३ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणेसाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवणार असल्याने शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.
तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले.
Chief Editor Nazeer Wagu 8879726577
Reported by Irfan shaikh
W News Channel