*भाऊसाहेब भोईर* *यांचे वाढदिवसा निमित्त* *अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे* *आयोजन.*
*भाऊसाहेब भोईर*
*यांचे वाढदिवसा निमित्त*
*अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे* *आयोजन.*
माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवार्थी शाखेचे उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (३ ऑगस्ट) पासून मंगळवार (दि.६ ऑगस्ट) पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देण्यात भाऊसाहेब भोईर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने गुरूवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
*कार्यक्रमाचे वेळ पत्रक असे आहे*
कार्यक्रमाचे वेळापत्रक असे आहे:
शनिवार, ३ ऑगस्ट:
संध्याकाळी ५:३० – ‘बाघमाऱ्या’ खान्देशी नाटक (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
रात्री ९:०० – ‘एक शाम भोलेनाथ के नाम’ राजस्थानी भजन संध्या
रविवार, ४ ऑगस्ट:
दुपारी १२:३० – लोपामुद्रा यांच्या बंगाली गाण्यांचा ऑर्केस्ट्रा (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
संध्याकाळी ५:३० – ‘ए रात्रेग पगेल्गु यानु’ दक्षिण भारतीय ‘तुल्लू’ नाटक (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
सोमवार, ५ ऑगस्ट:
दुपारी १२:३० – ‘अहो नादच खुळा’ लावणी कार्यक्रम (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
संध्याकाळी ६:०० – ‘खेळ पैठणीचा’ मधुसूदन ओझा (चंद्र माऊली मंगल कार्यालय, वाकड)
मंगळवार.
मंगळवार, ६ ऑगस्ट:
दुपारी १२:३० – ‘शिवतांडव’ मराठी नाटक (निळू फुले नाट्यगृह, सांगवी)
संध्याकाळी ६:०० – भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
मुलाखतीनंतर – ‘द एवर ग्रीन किशोर कुमार’ हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा (प्रशांत साळवी)
यावेळी कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
W…..न्यूज चॅनल चे वतीने आपणास वाढदिवसाचे हार्दिक!हार्दिक! शुभेच्छा!🌹