*पर्यावरण नियम धाब्यावर * प्रशासनाचे दुर्लक्ष,कारवाई संदर्भ नागरीक प्रतीक्षेत.
*पर्यावरण नियम धाब्यावर *
प्रशासनाचे दुर्लक्ष,कारवाई संदर्भ नागरीक प्रतीक्षेत.
वृक्षावली आम्हा सोयरी म्हणजे काय तर झाडे आपले मित्र आहेत.वुक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही..मानवाची सेवा करण्यात निसर्गाचां फार मोठा सहभाग आहे.वृक्ष आपले जीवन प्रभावित करते असे नाही तर ते आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रधान करतात.
परंतु मानव आज या संजीवनीच नाश करून वृक्षाचे कत्तल करून मानव निसर्गाचा
विनाश करत आहे.असेच काळेवाडी प्रभाग २२, विजयनगर, मध्ये १८ mtr डी.पी रस्ता लकी बेकरी मार्गे बालाजी कार्यालय मार्गे Brt रस्ता लागत पर्यावरण नियम अंतर्गत १५ वर्षा पूर्वी १० फीट अंतरावर झाडे लावण्यात आली होती.या झाडांचे संगोपन करीत हे झाडे आज रोजी मोठे झाले असताना या परिसराची शोभा वाढविण्याची भूमिका बजावित होती.तसेच उन्हाळ्यात सावली,व मानव जातीला ऑक्सिजन प्रधान करीत होती.परंतु या ठिकाणी रस्त्या लागत असलेले भूखंड धरकाने मोठे व्यावसायिक इंटेरियर वस्तू चे मॉल उभारले या मॉल चे मालक नितीन जयराम उदासी यांनी १४ जुनं २०२४ ,रोजी दुकानं कडे झुकले ले फांद्या तोडण्याची परवानगी मागितली होती व ती उद्यान विभागाने दिली होती. परंतु या वृक्षाची वाढलेले पाने,फांदी छाटणी करणे दूरच या भूखंड धारखाणे हे वृक्ष ज्याचे संगोपन गेली १५ वर्ष केले गेले तेच छाटून टाकले.या परिसरात सदर विषयी असंतोष पसरला आहे.काही संघटनांनी या विषयी पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागास निवेदन देऊन कारवाई करण्या संदर्भ विनंती केली असताना प्रत्येक्षात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही याची खंत नागरीक मध्ये आहे.एका बाजूला पर्यावरण नियम अंतर्गत रस्ता लागत १० फीट अंतरा वर झाडे लावणे बंधनकारक आहे.दुसरी कडे हीच झाडे संगोपन करीत मोठे होतात,नंतर हेच प्रशासन त्यांचे कत्तल करण्याची परवानगी देतात.हा काय प्रकार आहे हे या परिसरात राहणारे नारीकान मध्ये चर्चे चां विषयी आहे .पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ,तसेच पर्यावरण विभागाने या विषयी तपास करून योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.Advertisement
(माजी नगरसेवक)श्री.प्रमोद. ताम्हणकर.
काळेडीतील हा रस्ता मोठ्या प्रयत्नातून विकसित केला गेला.पर्यावरण नियम अंतर्गत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी झाडे लावली व त्याचे संगोपन करण्यासाठी पाठ पुरावा करत या भागाचे विकास केले.अत्यंत दुःख होत आहे की काही व्यावसायिक आपल्या निजी स्वार्था साठी गेली १५वर्ष जतन केलेली झाडे छाटून टाकत आहे.प्रशासनाने कैदेशिर कारवाई करून पर्यावरणाचे जतन केले पाहिजे अशी अपेक्षा आम्ही करितो.*नियम काय सांगतात.*
कोणते ही झाड वीणा परवाना तोडणे,जाळणे,असे प्रकार केल्यास तो व्यक्ती,कैद्या चे चौकटीत गुन्हेगार ठरतो.अश्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्र नागरी षेत्र झाडांचे सुरक्षा अधिनियम १९७५ नुसार ५००० रुपये दंड व १वर्षाची शिक्षा आहे.रिपोर्टर:शेख.इरफान.अब्दुल रहीम.