*पिंपरी चिंचवड* मध्ये *बांग्लादेशात हिंदूंवर होणारे* *हल्ल्याचे निषेधार्थ मोर्चा.*


*पिंपरी चिंचवड* मध्ये *बांग्लादेशात हिंदूंवर होणारे* *हल्ल्याचे निषेधार्थ मोर्चा.*

बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून आज (दि.१८) सकाळी मोर्चा काढला आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजरंगदल, दुर्गा वहिनी आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या मार्गावर हे भगवे वादळ आले होते.

मोर्चाद्वारे मांडण्यात आलेल्या तीन प्रमुख मागण्या:

1. बांगलादेशातील अत्याचार थांबविण्यासाठी हस्तक्षेप:

बांगलादेशातील हिंदू, जैन, आणि बौद्ध समुदायावर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा.

Advertisement

2. CAA अंतर्गत नागरिकत्व प्रक्रिया:

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नुसार, बांगलादेशातून आलेल्या हिंदू, जैन, आणि बौद्ध शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.

 

3. अवैध घुसखोरांविरोधात कारवाई:

पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर, बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत याचे सर्वेक्षण तातडीने करावे. त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. त्यांच्यामुळे भारतीय तरुणांचा रोजगार हिरावला जात आहे. भारतीय संस्कृतीला त्यांच्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. बांगलादेशी मुसलमान घुसखोर
आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर शोधून ताबडतोब देशाबाहेर हाकलून देण्यासाठी युध्य पातळीवर प्रयत्न करावे.

स्थानिक प्रशासनाचे आश्वासन

स्थानिक प्रशासनाने मोर्चाकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेतली असून त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील असे आश्वासन दिले आहे.

W News Channel 8879726577

[email protected]

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!