*युवक राष्ट्रवादी *काँग्रेस तर्फे *पिंपरी चिंचवड आयुक्तांना महिला* *विद्यार्थिनी* *सुरक्षा,विषयी *निवेदन***
*युवक राष्ट्रवादी *काँग्रेस तर्फे *पिंपरी चिंचवड आयुक्तांना महिला* *विद्यार्थिनी* *सुरक्षा,विषयी *निवेदन***
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह (हॉस्टेल) तील सुरक्षितताबाबत मनपा आयुक्ताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने दिले निवेदन…
W……न्यूज.
(पिंपरी, दि.२१)आज आपल्या राज्यात दिवसेदिवस डॉक्टर, शिशु वर्गातील विद्यार्थीनी, महाविद्यालयीन विद्यार्थीनी यांचे वर दैनंदिन लैंगिक अत्याचार, बलात्कार, निघृण हत्या ह्या भयावय दृषकृत्याचा प्रकार वाढतच आहे, भयानक परिस्थिती निर्माण होऊ घालत आहे. या पाश्र्वभूमीवर आपण प्रशासक तसेच मनपा आयुक्त या नात्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, महिला वसतिगृह, बालवाडी या सर्व ठिकाणी CCTV कॅमेरा सुरु आहे का.? याची तपासणी करावी, प्रत्येक जागी CCTV कैमेरा बसविणे, रुणालयात, वसतिगृह, या ठिकाणी अनोळखी व्यक्ती प्रवेश करणाऱ्याची चौकशी करूनच प्रवेश द्यावे. या अनुषंगाने तरुण मुली, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्या करिता गंभीरतेने दखल घ्यावी, त्याच प्रमाणे बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी मुंबई मध्ये विशाखा समिती स्थापन केली. तशीच विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी कॉपर्पोरेट कार्यालयाच्या धरतीवर विशाखा समिती पिंपरी चिंचवड शहरात स्थापन करण्यात यावी मुंबई महानगर पालिकेनी जी सुरक्षा योजना योजली आहे ती योजना आपल्या पिंपरी चिंचवड शहरात व्हावी व त्वरित शीघ्रतेने सुरक्षितेतीची अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने करण्यात आली.
यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे, कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माच्छरे, भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शहर उपाध्यक्ष हर्षल मोरे, कुणाल सोनिगरा इत्यादींसह अनेक युवक पदाधिकारी उपस्थीत होते.
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu