महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना लाडक्या बहिणी योजनेच्या आभारासाठी पाठवल्या ३५० राख्या…*
*राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे पिंपरी चिंचवड शहरात रक्षाबंधन साजरे…*
*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना लाडक्या बहिणी योजनेच्या आभारासाठी पाठवल्या ३५० राख्या…*
रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि आपुलकीचा समजला जातो या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते त्याच्या प्रगतीवर दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते तसेच आलेल्या सर्व बहिणींकडून मा.अजितदादांना राख्या पाठवण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांनी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि या योजनेचा लाभ देखील लाडक्या बहिणीला मिळत आहे, त्यामुळे पिंपरी विधानसभेच्या वतीने सर्व बहिणींनी अजितदादा पवार यांना पोस्टाने ३५० राख्या पाठवण्याचा उपक्रम राबविला तसेच अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित महिला अध्यक्ष प्रा.कविता आल्हाट, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा अध्यक्ष कविता खराडे, माधवी सोनार, रतन जगताप, सविता धुमाळ, ग्राहक सेल अध्यक्ष पल्लवी पांढरे, भारती काळभोर, क्षमा सय्यद, मुक्ता चंदनशिवे, लता सोनवणे, विशाखा इंदलकर, अलका उघडे, देवी थोरात, रचना गायकवाड, नंदा देसाई, सुनिता शेवाळे, जया रोकडे, लक्ष्मी बनसोडे, ज्योती चक्रवर्ती, नंदा इंदलकर, सुनीता चाबुकस्वार आदी महिला उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी विधानसभा अध्यक्षा कविताताई खराडे यांनी केले होते.
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu •