*कार्यकर्ता निर्धार मेळावा *यशस्वी.*विकास कामांवर निवडणूक लढविण्याचा दादांचा निर्धार.*


 

*कार्यकर्ता निर्धार मेळावा *यशस्वी.*विकास कामांवर निवडणूक लढविण्याचा दादांचा निर्धार.*

Advertisement

आज काळेवाडी येथे रागा पॅलेस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट यांची जनसंवाद सभा आयोजित केली गेली होती.या अनुषंगाने या परिसरात मोठ्या संख्ये ने कार्यकर्ता,नागरीक,सोसायटी चे सदस्य, विविध संघटने चे पदाधिकारी,तसेच पी.एम.पी.एल संघटने चे शिष्ट मंडळ, या ठिकाणी आपल्या आपल्या मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,तसेच पुणे जिल्हा चे पालक मंत्री यांना भेटून आपले आपले निवेदन ,मागण्या सदर केलं.दादांनी त्या सर्वांशी चर्चा करीत त्यांना आश्र्वासित केले.
कार्यक्रमाची शूरवात होताच ,सर्वात प्रथम,Dr.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा ला पुष्प हार टाकून वंदन करण्यात आले.
या वेळी अनेकांची भाषणे झाली, यात माजी नगरसेविका शमीम पठण यांनी १९९१ साली जेव्हा दादा पहिल्यांदा खासदार झाले त्यांच्या बरोबर काम करीत आलेला अनुभव व्यक्त केला व दादांना आश्र्वासित केले की आम्ही तेव्हा पण आपल्या बरोबर होतो,आज ही आहे,उद्या ही राहू अल्पसंख्यांक समाजाला न्याय हे दादाचं देऊ शकतात.व विशाळगड वर दादा सर्वांना भेट देऊन आले व त्यांनी तेथील महिलांशी चर्चा करून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले याची माहिती त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना दिली.व दादा सर्व समाजाला एकत्र घेऊन चाललेला नेता आहे सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकत दिली पाहिजे असे सांगितले.
तसेच माजी आमदार विलास लांडे यांनी ही आपला अनुभव व्यक्त केला व स्पष्ट केले की दादा नी या शहराला ,आझम भाई सारखा मुस्लिम महापौर दिला,मला देखील नगरसेवक ,महापौर,आमदार केले,योगेश बहल हे पंजाबी त्यांना देखील महापौर केले,जगदीश शेट्टी हे कर्नाटक चे आहे,त्यांना देखील चैरमन, पक्षा चे अध्यक्ष केले,तर दादा हे सगळ्या समाजाला घेऊन चालणारे नेता आहेत,त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात सर्व जाती चे लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे.आणि सर्वात शेवटी त्यांनी पिंपरी चिंचवड शहराला आमदार अण्णा बनसोडे यांना ४महिन्यासाठी मंत्री पद द्यावे अशी मागणी केली.
या नंतर बाबा कांबळे जे कष्टकरी संघटने चे अध्यक्ष आहेत त्यांनी व्यास पिठावर येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटा ला आपला पाठिंबा जाहीर केला व येणाऱ्या दोन महिन्यात पुणे,तसेच पिंपरी चिंचवड शहरात ५००गुलाबी रिक्षा वाटपाचे कार्यक्रम स्वात्ता नियोजन करण्याचे संकल्प बांधले व दादांना विनंती केली की आपण या कार्यक्रमा साठी उपस्थित राहावे.
महाराष्ट्र राज्याचे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांनी सभे मध्ये जोश भरीत विरोधकांना आरसा दाखवून उघडा पाडला.व सर्व महिलांना मिळणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे असे सांगितले.
या नंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,तसेच वित्त मंत्री अजित दादा पवार साहेबांनी आपल्या भाषणात,माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे उलाढाल ही आज रोजी ४२ लाख कोटी ची झाली आहे.या सर्व गोष्टी चा अभ्यास करून या योजना आम्ही गरीब,कष्टकरी,हमाल,रिक्षा चालवणारे गजले रांजले लोकं साठी अमलात आणली असे करण्या मागचे आमचे उद्दिष्ट आहे की समाजातील गरीब घटकाला ,न्याय मिळू,त्यांच्या जीवनात असलेल्या गरजा पूर्ण होवून, तो आत्मसन्मान नी जगो .
तसेच अनेक पालक आपल्या मुली ल शिक्षण साठी पैसे नसल्याने त्यांचे लग्न लावून टाकतात माझी अश्या सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुली वार अन्याय करू नका त्यांना शिकवा,शासन आपल्या साठी मदतीचा हाथ पुढे केला आहे आपण या योजनांचा लाभ घ्या.जार तर शिक्षण संस्था या योजनांची अंमल बजावणी करीत नसेल तर त्यावर कडक कारवाई चे संकेत देखील त्यांनी या वेळी आपल्या भाषणातून दिले.
या बजेट सत्र मध्ये शेतकरी चे विद्युत बिल देखील माफ करण्याची माहिती त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना दिली व सर्व कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या भागात जोमाने काम करण्याची सूचना दिली.लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात दर १५दिवसाला माझे सचिव येतील व आपल्या तक्रारी सिकरून ते आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांच्या कडून मार्गी लावण्याचे काम करतील,अशी भावनिक साद उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर आहे.या ठिकाणी उद्योग कशे वाढतील या साठी आम्ही काम करीत आहोत.आम्ही त्यांना वीज बिल मध्ये दीड ते दोन रुपये कमी करून हे करीत आहे.तसेच निगडी ते कात्रज मेट्रो प्रकल्प देखील मी हातात घेतला आहे.तो ही लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे दादांनी आपल्या भाषणात विकास कामा संदर्भ माहिती कार्यकर्त्यांना दिली.येणारी निवडणूक ही विकास काम वाराच होणार,विरोधकांना काही मुद्दे नसल्याने काही न काही नर्रतिवे सेट करत असतात अशी टीपनी देखील त्यांनी केली व कार्यकर्त्यांना अश्या लोकांना माजी उत्तर देण्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये पिंपरी चिंचवड शहराचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बेहल,जगदीश शेट्टी,महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकण कर, माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे,सतीश.मिसाळ,विजय लोखंडे,शमीम पठाण मोहम्मद भाई पानसरे,विनोद नढे,संतोष कोकण,दिलीप काळे,उषा काळे,विजय सुतार,सचिन काळे,फजल शेख, इत्यादी मान्यवर,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ता,महिला युवा मोठ्या संख्ये ने उपस्थित होते

Reported by : Irfan Shaikh

Cheif editor: Nazeer wagu

[email protected]

8879726577


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!